श्री नवयुवक मनाची कावड यात्रा वतीने घाटपुरी येथे दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांसाठी 24 तास आ रो चे थंड पाणी वाटप

खामगाव:- जनोपचार न्यूज नेटवर्क :+-खामगाव शहरातील सुप्रसिद्ध आणि पुरातन श्री नवयुवक  मानाची कावड यात्रा वतीने वर्षभर सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्याच अनुषंगाने सध्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवात हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या घाटपुरी येथील श्री जगदंबा मातेच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांकरिता गोमाता गौरक्षण या ठिकाणी ९ दिवस २४ तास आ रो चे थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून सोबतच भाविकांकरिता सोमवारी दि ७ रोजी सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत आणि सायंकाळी ४ ते १० या वेळेत चहा वाटप करण्यात येणार आहे.तसेच मंगळवार दि ८ रोजी सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत फरक (उसळ) वाटप करण्यात येणार आहे.व बुधवार दि ९ रोजी सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत खिचडी वाटप करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे गुरुवारी आणि शुक्रवारी देखील विविध खाद्यपदार्थ वाटप करण्यात येणार.तसेच श्री नवयुवक मानाची कावड यात्रा वतीने सुरू करण्यात आलेल्या रुग्णसेवेच्या माध्यमातून भाविकांसाठी २४ तास रुग्णवाहिका सुध्दा ठेवण्यात आलेली आहे.रुग्णसेवा हवी असल्यास मो नंबर ९८९०८१९१३१ राहुल कळमकार ७०२०५६४२११ धिरज कंठाळे यांचेशी संपर्क साधावा तरी सर्व भाविक भक्तांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मानची कावड यात्रा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राहुल भाऊ कळमकार यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم