लॉयन्स क्लब संस्कृतीतर्फे शिक्षक दिवस

खामगाव - जनोपचार न्यूज नेटवर्क :- सामाजिक सेवेत नेहमीच अग्रेसन असणाऱ्या खामगांवच्या लॉयन्स क्लबसंस्कृतीतर्फे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षण दिन अनोख्या पध्दतीनेसाजरा करण्यात आला. लॉयन्स क्लब संस्कृतीच्या माध्यमातुन स्थानिक रहिवासीनियमितपणे मूकबधीर शाळेला त्यांची सेवा देतात. या शाळेतील संपुर्ण शिक्षक वकर्मचाऱ्यांना ५ सप्टेंबर रोजी शाळेच्या प्रांगणात स्मृतीचिन्ह देवुन गौरव करण्यातआला. विशेष म्हणजे स्मृतीचिन्हावर सर्व कर्मचाऱ्यांनी दिव्यांग मुलींना दिलेल्या सेवांबद्दलकृतज्ञता व्यक्त केली. क्लबचे अध्यक्ष लॉ. शैलेश शर्मा यांनी निवासी मुकबधीरविद्यालयातील संपुर्ण कर्मचारी व शिक्षकांच्या समर्पणाचे व सेवेचे कौतुक केले



. प्रकल्पप्रमुख एमजेएफ लॉ. अभय अग्रवाल, एमजेएफ लॉ. अजय एम. अग्रवाल यांनीही सर्वशिक्षकांचे आभार मानले आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले. क्लबचे सचिव लॉ. गजानन सावकार, लॉ. अजय छतवाणी, लॉ. रविंद्रसिंग बग्गा व संस्कृतीचे क्लबचे सर्व सदस्यअधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान शाळेचे प्राचार्य डॉ. प्रकाश जगताप वमुकबधीर विद्यालयाचे सर्व विश्वस्त उपस्थित होते. उपरोक्त माहिती क्लबचे मार्केटींगकम्युनिकेशन चेअरपर्सन एमजेएफ लॉ. राजकुमार गोयनका यांनी दिली आहे.

Post a Comment

أحدث أقدم