फेसबुक वर रिक्वेस्ट.. व्हाट्सअप वर चॅटिंग..दोघांची भेट.....आणि नंतर....

खामगाव:- त्याने तिला फेसबुक वर रिक्वेस्ट पाठवली.. व्हाट्सअप वर बोलणं सुरू झालं... त्याने दिला खामगाव येथील प्रसिद्ध हॉस्पिटल जवळ बोलावलं... नंतर तिला शेगाव रोडवरील एका कॅफे सेंटर वर नेले... तिथे या दोघांमध्ये प्रत्यक्ष ओळख झाली.. त्यानेही खोटे अमिष दाखवून तिच्यासोबत नको ते केले... आणि मग झाला गुन्हा दाखल. ही कहाणी नसून खामगाव येथील घटना आहे. 

या घटनेबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २६ ऑगस्ट २४ रोजी आरोपीने पिडितेच्या फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवीली त्यानंतर आरोपीची व पिडितेची मैत्री होवुन व्हॉटसप व फेसबुकवर बोलने सुरु झाले . हे बोलणे सुरू असतानाच आरोपी याने पिडितेस हीस सिल्व्हरसीटी हॉस्पीटल खामगांव जवळ  बोलावले पिडिता ही तेथे गेल्यानंतर आरोपी याने तिला दुचाकी वर बसवुन शेगांव रोडने सनशाइन कँफेवर घेवुन गेला व तेथे दोघा मध्ये बोलचाल हावुन प्रत्यक्ष ओळख झाल्याने आरोपी याने मी तुझे सोबत फारकती झाल्यानंतर लग्न करतो असे खोटे आश्वासन देवुन शारिरीक संबध केले. त्यानंतर मात्र तु माझे सोबत फोनवर बोलु नको असे म्हणुन पिडिते चा नंबर ब्लॉक मध्ये टाकला . याबाबत पीडीतेने पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विनोद ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

Post a Comment

أحدث أقدم