मोहम्मद फारुक सर ‘पहाट महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित 


खामगाव: जनोपचार न्यूज नेटवर्क :- खामगाव येथील ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारुक यांचा पहाट फाउंडेशन तर्फे औरंगाबाद येथे पहाट महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला

पहाट फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, छत्रपती संभाजीनगर यांच्या तर्फे  दरवर्षी समाजकार्य, पत्रकारिता, शैक्षणिक, युवा उद्योजक, क्रीडा, साहित्य, कृषी अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या गुणीजणांना पहाट महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते. 

 १४ सप्टेंबर रोजी नांदापुरकर सभागृह, मराठवाडा साहित्य परिषद, पैठण गेट, औरंगाबाद येथे पार पडलेल्या कार्यक्रमात चैत्राम पवार (महाराष्ट्र शासनाचा पहिला वनभूषण पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ), डॉ.जीवन राजपूत (जे जे प्लस हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर), मारुती म्हस्के (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय छ.संभाजीनगर) आदी मान्यवर उपस्थित होते यावर्षी ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारुक यांना कोटा राजस्थान पुणे येथील विविध संघटना तर्फे सुद्धा सन्मानित करण्यात आले याप्रसंगी अंजुमन हायस्कूल खामगाव चे शिक्षक असलम परवेज खान  व फजील अरशद खान यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार , माजिद खान अन्वर खान व मोहसीन खान अन्वर खान यांना राज्यस्तरीय युवा उद्योजक पुरस्कार , अतहर अहमद खान अफसर खान बालापुर यांना महाराष्ट्र राज्य स्तरीय समाज भूषण पुरस्कार , ईश्वर सिंग ठाकूर खामगाव व प्रा आताऊल्ला खान यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार , मोहम्मद इकबाल वडनेर  भोलजी यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार , मोहम्मद अन्सार मोहम्मद युसुफ व मोहम्मद अजहर मोहम्मद युसुफ मंगरूळपीर यांना राज्यस्तरीय युवा उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

Post a Comment

أحدث أقدم