गोरक्षण संस्थान येथे पोदार शाळेची सहल

खामगाव -जनोपचार न्यूज नेटवर्क :-  दि.१३ सप्टेंबर रोजी लॉयन्स क्लब संस्कृतीच्या वतीने गोरक्षण संस्थान येथे सहलीसाठी आलेल्या पोदार शाळेतील विद्यार्थ्यांना आपली संस्कृती, गोसेवा व गायींची सविस्तर माहिती गोरक्षण संस्थानचे विश्वस्तांमार्फत देण्यात आली. लॉयन्स क्लब संस्कृतीच्या माध्यमातून भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना बिस्कीटे व खाऊ वाटप करण्यात आले. या सेवा कार्यासाठी लॉ. योगेश शर्मा, लॉ.दिपक खंडेलवाल, लॉ. राजु थाडा, लॉ. प्रशांत सानंदा, कोषाध्यक्ष लॉ. गजानन सावकार तसेच गोरक्षण संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते. उपरोक्त माहिती क्लबचे मार्केटींग कम्युनिकेशन चेअरपर्सन एमजेएफ लॉ. राजकुमार गोयनका यांनी दिली आहे.

Post a Comment

أحدث أقدم