तब्बल 3 तास मिरवणूक थांबली...
शेगांवात शांततेत गणपती विसर्जन
एएसपी थोरात, डीवायएसपी ठाकरे यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात
शेगांव जनोपचार न्यूज नेटवर्क :- शेगाव येथे गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान घडलेल्या दगडफेकीच्या घटनेने शहरात तणाव निर्माण झाला होता. मात्र अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात व dysp विनोद ठाकरे यांनी मंडळ कार्यकर्त्यांना विश्वासात घेत कारवाही चे आश्वासन दिले. त्यामुळे गणपती विसर्जन मिरवणुकीला पुन्हा सुरुवात झाली व शांततेत विसर्जन झाले.
या बाबत मिळालेल्या माहितनुसार शेगाव शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले असून या घटनेत गणेश मंडळांनी दोषींवर कारवाई केल्याशिवाय विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जवळपास दोन ते तीन तास विसर्जन मिरवणुक रस्त्यावरच थांबलेले होते.त्यामुळे काही काळ शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 17 सप्टेंबर रोजी शेगाव शहरात गणपती विसर्जन मिरवणूक चालू असताना विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान साडेचार वाजता गावातील एक मंडळ शहीद भगतसिंग चौकात आले असता किरकोळ कारणावरून अज्ञात व्यक्तीने मंडळावर दगडफेक केल्याची घटना घडली.
शेगाव शहरात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीला गालबोट लागल्याची घटना समोर आली आहे. शहीद भगतसिंग चौक या परिसरात किरकोळ वादातून गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवर अज्ञातांनी दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. जोपर्यंत दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत बाप्पाचं विसर्जन करणार नसल्याची भूमिका या गणेश मंडळाने घेतली होती. त्यामुळे तब्बल तीन तासांपासून मिरवणूक एकाच ठिकाणी थांबून होती. मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ वादातून गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र जोपर्यंत दगडफेक करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत मिरवणूक पुढे जाणार नसल्याचा पवित्रा गणेश मंडळाने घेतल्याने पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता.
उपविभागीय अधिकारी विनोद ठाकरे तसेच शेगाव पोलीस शहरचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनटक्के यांनी सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढली मात्र कार्यवाही करेपर्यंत मंडळ पुढे जाणार नाही अशी भूमिकाच मंडळांनी घेतल्याने जवळपास तीन तास शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात हे ताबडतोब शेगाव दाखल झाले व त्यांनी स्वतः मंडळाची समजूत काढली व त्यांच्याव दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई होणार असे आश्वासन दिल्यानंतर सुमारे साडेसात वाजता सर्व मुख्य मिरवणुकीतील मंडळाच्या मिरवणुकीला पुन्हा सुरुवात झाली व शांततेत विसर्जन पार पडले. परस्पर तक्रारीवरून दोन्हीही गटाच्या काही युवकांवर रात्रीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
إرسال تعليق