मुक बधिर विद्यालय व रोटरी क्लब द्वारा संचालित रोटरी मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हस्ते श्री लाकडी गणपती मंदीरात आरती संपन्न
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क- शनिवार दि. १४ सप्टेंबर रोजी श्री लाकडी गणपती मंदीर येथे मुक बधिरविद्यालय व रोटरी क्लब द्वारा संचालित रोटरी मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हस्तेश्री लाकडी गणपती, अय्याची कोठी येथे आरती संपन्न झाली. यावेळी शाळेतीलशिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी आदींची उपस्थिती होती. तसेच सुरज अग्रवाल, अॅड. धनंजयभेरडे, चंद्रशेखर पुरोहित, अजय अग्रवाल, संजय झुनझुनवाला, राजेश अग्रवाल, संजयगिरजापुरे, डॉ. अनिल चौहान, अमित गोयनका, अभिषेक अग्रवाल, नविन झुनझुनवाला,गोपाल दायमा, रमेशभाऊ राठोड, राजुभाऊ झांबड, हरीभाऊ सपकाळ, संतोष भाऊसह अनेक भक्तगण उपस्थित होते. वरील माहिती राजकुमार गोयनका यांनी दिलीआहे.
إرسال تعليق