पत्रकार गणेशोत्सव मंडळाच्या वतीने अग्रवाल हॉस्पिटलमध्ये आरोग्य शिबिर संपन्न
अग्रवाल हॉस्पिटलमध्ये 52 वे शिबिर:१० हजाराच्या वर रुग्णांची तपासणी
खामगाव, जनोपचार न्यूज नेटवर्क ः पत्रकार गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सव निमित्त ता. १२ सप्टेंबर रोजी अग्रवाल हॉस्पिटल, गोकुळ नगर खामगाव येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १५० च्या वर रूग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. एकंदरीत डॉक्टर नितीश अग्रवाल यांच्या हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत 52 शिबिरे झाली असून जवळपास दहा हजार च्या वर रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे हे विशेष!
यावेळी शिबिराचे उद्घाटक म्हणून सामान्य रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.निलेश टापरे तर प्रमुख उपस्थिती म्हणून खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोरआप्पा भोसले, प्रेस क्लब खामगावचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, जेष्ठ पत्रकार जगदीश अग्रवाल, पत्रकार गणेश मंडळाचे अध्यक्ष गणेश पानझाडे, सचिव मुबारक खान, पत्रकार योगेश हजारे, अनिल खोडके, अग्रवाल हॉस्पिटलचे संचालक डॉ. नितीश अग्रवाल, स्त्रीरोग विशेषज्ञ डॉ. शारदा अग्रवाल यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते गणराया व श्री हनुमान यांच्या प्रतिमेचे पुजन करून दिपप्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.निलेश टापरे म्हणाले की, पत्रकार गणेश उत्सव मंडळाकडून गणेशोत्सवाच्या अनुषंगाने घेण्यात येणारे सामाजिक उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहेत. तर अग्रवाल परिवाराचे सुध्दा वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक कार्यात भरीव योगदान असून त्यांनी हॉस्पिटलच्या उद्घाटनापासून ते आजपर्यंत घेतलेले ५१ शिबिर पाहता त्यांचे समाजसेवेचे हे व्रत असेच पुढेही सुरू राहो अशा शुभेच्छा दिल्या. यानंतर रूग्णांच्या तपासणीला सुरूवात करण्यात आली.
या शिबिरामध्ये बी.एम.डी. टेस्ट म्हणजे हाडाच्या ठिसूळतेची मशीनद्वारे तपासणी व यूरिक ॲसिड ची रक्त तपासणी मोफत करण्यात आली. तसेच एक्स-रे आणि गर्भवती मातांची सोनोग्राफी तपासणी शुल्क मध्ये ५०% सूट देखील देण्यात आली. यावेळी अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. नितीश अग्रवाल आणि स्त्रीरोग विशेषज्ञ डॉ. शारदा अग्रवाल यांनी रुग्णांची तपासणी करून सल्ला व मार्गदर्शन केले. या शिबिराचा १५० च्या वर रूग्णांनी लाभ घेतला.
إرسال تعليق