खामगांवात रोटरी क्लबव्दारे गो से महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास शिबिर रायलाचे आयोजन

Khamgaon janopchar news network:- रोटरी यूथ लीडरशिप अवॉर्ड्स (RYLA) हा रोटरी क्लबद्वारे आयोजित केलेला एक गहन नेतृत्व अनुभव आहे जिथे तुम्ही तुमचे नेतृत्वगुण कौशल्ये विकसित करू शकता. RYLA भविष्यातील भावी नेतृत्वाला वास्तविक जगात येणाऱ्या अडथळ्यांना कसे हाताळायचे हे शिकविण्यात मदत करते. रोटरीने RYLA द्वारे तरुणांना महत्त्वाची जीवनमूल्ये शिकवलेली आहेत. यामध्ये परस्पर संवाद, टीम बिल्डिंग, ग्रुप समस्या सोडवणे आणि प्रोजेक्ट टीम्समधील परस्पर व्यवस्थापनासारखे उपक्रम राबविले जातात. मानसिक सक्षमतेसाठी स्वयंशिस्त, स्पष्टता, ध्येय, सातत्य आणि नियोजन या पंचसुत्रीचा अवलंब करण्याचा व आयुष्यातील चढ उतारांचा सामना करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन जोपासण्यासाठी असे शिबीर महत्वपूर्ण ठरतात.  



असाच एक उपक्रम रोटरी क्लब खामगावद्वारे स्थानिक गो से महाविद्यालयात दिनांक १७ व १८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये आठवी ते बारावी पर्यंतच्या वयोगटातील विद्यार्थ्याचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रशिक्षक म्हणून नागपूर येथील सुप्रसिद्ध ट्रेनर मुकेश आशर व निलेश लांजीवार हे लाभलेले आहेत. या शिबिराला सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस यांचे प्रायोजकत्व लाभलेले आहे. उद्घाटन समारंभ १७ ऑगस्ट रोजी सकाळी ०९.३० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.


सर्व सत्रांमध्ये वेगवेगळ्या खेळांद्वारे विद्यार्थ्यांच्या ज्ञानासोबतच भरपूर मनोरंजनाचेदेखील आयोजन करण्यात आलेले आहे. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाची आखणी केलेली आहे ज्याद्वारे सहभागी आपापल्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचे प्रदर्शन करू शकतील. दोन दिवसीय प्रशिक्षणात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नाश्ता, भोजन व हाय टी रिफ्रेशमेंटची सोय रोटरी क्लबदवारे करण्यात आलेली आहे. नोंदणी करण्यासाठी अग्रसेन भवन जवळील स्टीम्युलस लर्निंग पॉईन्ट, मेन रोडवरील समीर बॉम्बे डाईंग व फरशी येथील शगुन कलेक्शन याठिकाणी संपर्क साधता येईल.


आपल्या पाल्यांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्याकरीता आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून पालकांनी व शिक्षकांनी त्यांना या व्यक्तिमत्व शिबिरासाठी प्रेरित करावे असे आवाहन प्रकल्पप्रमुख निशांत गांधी, सह-प्रकल्पप्रमुख सौरभ चांडक यांचेसह रोटरी क्लब अध्यक्ष विजय पटेल, मानद सचिव किशन मोहता व सहसचिव विनीत लोडाया यांनी केलेले आहे.

Post a Comment

أحدث أقدم