राष्ट्रवादी ची खामगाव मध्ये महत्त्वपूर्ण बैठक

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची औद्योगिक व व्यापारी विभागाची संघटनात्मक बैठक ही रविवार एमआयडीसी खामगाव येथे प्रदेशाचे संघटन सचिव रावसाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती तसेच एमआयडीसी असोसिएशन चे उपाध्यक्ष  राजेशजी तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली तर पक्ष जिल्हा संघटक संभाजीराव टाले जिल्हा ओबीसी निरीक्षक संजय बगाडे पक्षाचे शहराध्यक्ष विकास चव्हाण अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष शेख सलीम ओबीसी तालुकाध्यक्ष संतोष पिसोडे तर सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष उमेश बाभुळकर तसेच

 उद्योगपती राजेश ब्रिजमोहन शर्मा व मनोज मधुसूदन अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत होती तर या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या औद्योगिक व व्यापारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी विनोद उर्फ बंटी राधेश्याम शर्मा यांची निवड करण्यात आली त्याचप्रमाणे जिल्हा सचिव म्हणून उमेश ब्रह्मदेवजी खंडारे यांची तालुका अध्यक्ष  शुभम संजयजी गवळी शहराध्यक्ष दिनेश ब्रह्मदेवजी खंडारे यांचीही निवड करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा संघटक संभाजीराव टाले यांनी पक्षाचा असलेला महत्त्वाचा विभाग म्हणजे औद्योगिक व व्यापारी विभाग या संदर्भात भूमिका मांडली .

तर जिल्हा ओबीसी निरीक्षक संजय बगाडे यांनी सांगितले औद्योगिक व्यापारी विभाग हा पक्षातील एक महत्त्वाचा विभाग आहे तर औद्योगिक व्यापारी बांधवांना मार्गदर्शन करताना प्रदेशाचे संघटक सचिव रावसाहेब पाटील यांनी सांगितले की पक्षाच्या माध्यमातून आपल्या औद्योगिक ज्या समस्या असतील त्या प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे होईल तर अध्यक्ष भाषणामध्ये बोलताना तिवारीजी यांनी सांगितले की पवार साहेब यांनी देशाच्या अनेक विभागामध्ये काम केले असून ते विकासशील नेतृत्व आहे तसेच आम्हा उद्योजकांना काय अडचणी असतात नव्याने काय निर्माण होत असतात व त्यासाठी काय होणे आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले तर या प्रसंग जिल्हा ओबीसी निरीक्षक संजय बगाडे तालुका अध्यक्ष संतोष पेसोडे यांनीही यांनीही सुद्धा आपले मत व्यक्त केले या कार्यक्रमाला एमआयडीसी तील उद्योगपती व व्यापाऱ्यांची  चांगलीच उपस्थिती होती .



Post a Comment

أحدث أقدم