माजी विद्यार्थी शासकीय तंत्रनिकेतन खामगाव या संस्थेची विशेष सभा नागपूर येथे संपन्न 

खामगांव : जनोपचार न्यूज नेटवर्क-  शासकीय तंत्रनिकेतन खामगाव च्या माजी  विद्यार्थी पंजीकृत संस्थेची विशेष सभा 23 आगस्ट 2024 रोजी नागपूर येथील रवि भवन च्या कमरा नं 8 मध्ये संपन्न झाली संस्थेचे अध्यक्ष जनार्दन  हिंमतराव भानुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत माजी अध्यक्ष  सतीश केवलराम विरमानी  , माजी सचिव रमेश मांगीलाल गट्टानी, उपाध्यक्ष नारायण  अवधूतराव  अकर्ते , उपाध्यक्ष मोहम्मद फारुक , सचिव संजय  प्रभाकरराव कुलकर्णी , माजी उपाध्यक्ष मदन मोहन जानकीराम  जोशी ,  सदस्य विजय हरिशचंद्र तराळे ,   सदस्य सुभाष नारायण ताले , सदस्य प्रविण  गिरधारी लालमोहता , सदस्य दयाराम खारोळे  प्रामुख्याने उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित सर्वांना एकमताने ठराव पारित केले या प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात जनार्दन भानुसे यांनी सर्वप्रथम उपस्थित सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले तसेच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक लाभ देण्याकरिता तसेच संस्थेची आर्थिक प्रगतीसाठी काही उपाययोजने बाबत ही मार्गदर्शन दिले या सभेत त्यांनी सांगितले की संस्थेच्या जे चार अधिकृत व्हाट्सअप ग्रुप आहे आणि त्यावर संस्थेची प्रगतीसाठी वेळोवेळी पोस्ट करण्यात येते परंतु या चार अधिकृत व्हाट्सअप ग्रुप व्यतिरिक्त व्हाट्सअप ग्रुप वर आपले सदस्य एडमिन न राहण्याचा निर्णय घेण्यात आला त्यांनी पुढे सांगितले की मी संस्थेच्या आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न करीत आहे व मला आशा आहे की लवकरात लवकर संस्थेला दानशूर व्यक्ती आर्थिक मदत करतील शेवटी जनार्दन भानुसे यांनी आजी-माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार मानले याप्रसंगी संस्थेचे माजी उपाध्यक्ष  मदन मोहन जानकीराम जोशी यांनी संस्थेद्वारे गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी 30 हजार रुपये संस्थेचे अध्यक्ष जनार्दन भानुसे यांचे  सुपूर्द केले

Post a Comment

أحدث أقدم