खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदी रामकृष्ण पवार
कायदा सुव्यवस्था बिघडविण्याच्या प्रयत्न केला तर कायदा मोडणाऱ्याची गय केली जाणार नाही- ठाणेदार पवार
खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदाचा कारभार प्रविन नाचनकर यांचे कडे होता मात्र त्यांच्या विरोधात जनतेची नाराजी व तसेच शहरात अवैध धंद्यांना उत आला होता. मात्र याकडे तत्कालीन ठाणेदार यांनी दुर्लक्ष करीत होते. ठाणेदार सामान्य जनतेला त्रास होत होता. अनेक तक्रारी व वाढती गुन्हेगारी पाहता कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या आदेशान्वये ठाणेदार प्रवीन नाचनकर यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर ठाणेदार आर. एन पवार यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार ठाणेदार आर. एन. पवार यांनी २६ आगस्ट रोजी खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदाचा पदभार स्वीकारला. ठाणेदार आर. पवार यांनी यापूर्वी शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदी काम केले आहे. त्यामुळे त्यांची या परिसरात चांगला वचक आहे
إرسال تعليق