"एक शाम किशोर दा के नाम" बहारदार हिंदी गाण्यांचा सुरेख नजराना...!
गाण्यांची प्रस्तुती आणि टाळ्यांची साथ...!!
कराओके सिंगर्स क्लबच्या आयोजनाचे सर्वत्र कौतुक
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क- प्रसिद्ध गायक स्व किशोरकुमार यांच्या जयंतीनिमित्त कराओके सिंगर्स क्लब खामगांवच्यावतीने 4 ऑगस्ट रोजी किशोरकुमार यांच्या अजरामर गाण्यांचा एक शाम किशोर दा के नाम हा बहारदार गायन कार्यक्रम हॉटेल तुळजाई येथे घेण्यात आला. यावेळी डॉक्टर, शिक्षक, एरिगेशन, महावितरण तसेच विविध क्षेत्रातील कलाप्रेमी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन किशोरकुमार यांची गाणी सादर केली. किशोरकुमार यांची गाणी विजय तराले, कचरू रेठेकर, प्रसन्जीत सन्याल, प्रा.राजेश मंत्री, नितेश मानकर, महादेवराव धंदरे, महावीर वासकर, ओमप्रकाश खरात, दिनेश सोळंके, अशोक मानकर, उमाकांत कोरडे, महर्षी साहेब, शिवकुमार डागा, शेखर सांगळे, डॉ.वकार मोहोसीन, गणेश हेंड, केशव धोटे, अनुप पाटील, ईश्वर ठाकूर, विजय मोदी, महेश शिंदे, संतोष गवई, डॉ.महेश आखरे, डॉ.गुरुप्रसाद थेटे यांनी बहारदार गीते सादर केली. सूत्रसंचालन ईश्वर ठाकूर, अनुप पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन साठी कराओके सिंगर्स क्लब खामगांव च्या प्रत्येक सदस्यांनी परिश्रम घेतले.
إرسال تعليق