श्रावण सोमवार निमित्त चिंचपूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
चिंचपूर जनोपचार न्यूज नेटवर्क :- श्रावण महिन्यातील पहिला सोमवार या दिवसानिमित्त चिंचपूर येथील पोलीस दलात कार्यरत असलेले चिंचपूर चे लाडके व्यक्तिमत्व राजुभाऊ भाऊ बोर्डे यांच्या पुढाकारातून श्रृंगऋषी संस्थान चिंचपूर येथे गावातील युवकांच्या व प्रतिष्ठित नागरिकांच्या सहकार्यातून शेकडो वृक्षांचे आज वृक्षारोपण करण्यात आले
यामध्ये प्रामुख्याने बेलाचे वृक्ष, पिंपळाचे, वडाचे, जांभूळ, कडुलिंब व फुलाचे वृक्षांची लागवड करण्यात आले यासाठी गावातील युवकांनी मेहनत घेतली. यामध्ये मधुकर महानकार , गुड्डा शेठ, शिरूबाप्पू देशमुख, तुळशीदास फाळके, शिवशंकर काळे, विजय बोर्डे, सुरेश शेळके, बाळूभाऊ कवडकर, पांडुरंग बोर्डे, काशिनाथ आप्पा उकर्डै, गजेंद्र खत्री, दिनकर फाळके , ज्ञानेश्वर काळे, दिनकर काळे, मधु शेळके, संतोष निर्मळ, गजानन हावरे ,ऋषी गरड, संतोष अंभोरे, विश्वंभर अंभोरे, गणेश रूतेले, गाडगे यासह बरेच नागरिक उपस्थित होते.
إرسال تعليق