काम करेल त्याला घरपोच उमेदवारी देणार - नाना पटोले

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व्दारा राज्यस्तरिय माळी समाज बांधवांची संवाद बैठक संपन्न



खामगाव: जनोपचार न्यूज नेटवर्क- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रातील माळी समाजातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची संवाद बैठक दि २६ आगस्ट रोजी पक्षाच्या प्रदेश मुख्यालय असलेल्या टिळक भवन मुंबई येथे आयोजित केली होती. नानाभाऊ पटोले यांचे मार्गदर्शनात आयोजित या बैठकीचे अध्यक्ष ओबिसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष  भानुदास माळी हे होते तर माजी आमदार कृष्णराव इंगळे, आमदार दिप्तीताई चौधरी, परभणीचे मा जि प सभापती नानासाहेब राऊत , नासिकचे विजयराव राऊत , डॉ . विलासराव पाटील धुळे , स्वातीताई वाकेकर , राजीव घुटे , अजय तायडे , प्रा गजानन खरात , अविनाश उमरकर, प्रविण भोपळे यांचे सह राज्यातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती.

महाराष्ट्रात माळी समाजाला किमान 15 जागा द्या -अजय तायडे

महाराष्ट्रात माळी समाज हा 60 मतदारसंघात निर्णायक भूमिकेत आहे. 25 मतदारसंघात माळी समाज बांधवांनी सक्षमपणे काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे किमान 15 जागांवर समाज बांधवांना उमेदवारी द्यावी अशी मागणी ओबिसी विभागाचे प्रदेश सचिव तथा राज्यस्तरीय परिचय महासम्मेलनाचे माजी अध्यक्ष अजय तायडे यांनी केली आहे .


या कार्यक्रमात माळी समाज बांधवांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा नानाभाऊ पटोले यांचेसोबत संवाद साधताना अनेक विषयांवर चर्चा केली. विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी तसेच संघटनात्मक बाबतीतही योग्य प्रतिनिधित्व मिळावे याचा विचार व्हावा, यावर सकारात्मक चर्चा झाली. याप्रसंगी बोलताना त्यांनी उपरोक्त विधान केले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर जाऊन काम केले पाहिजे, जो काम करेल त्याला मुंबई दिल्ली वारीकरण्याचे काम नाही, काम असेल त्यांना घरपोच उमेदवारी देणार असल्याचे परखड मत त्यांनी व्यक्त केले. 


*प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी प्रयत्न करणार- भानुदास माळी*

ओबीसीमध्ये  अठरापगड जातींचा समावेश असून माळी समाजाची भूमिका ही मोठ्या भावाची आहे . त्यामुळे माळी समाजासोबतच ओबिसींचे प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. माळी समाजाला महात्मा फुलेंच्या सामाजिक क्रांतीचा वारसा लाभलेला असुन शाहु फुले आंबेडकर विचारधारा माननारा आहे, त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या विचाराशी संगत असलेला सर्वधर्मसमभाव चा विचार जोपासत काँग्रेस पक्षासोबत बहुसंख्य समाज आहे. त्यामुळे प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले.

*

कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण व नेपाळमध्ये मृत्यु झालेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन करण्यात आली . यावेळी कृष्णराव इंगळे, दिप्तीताई चौधरी , नानासाहेब राऊत, प्रा. गजानन खरात, अविनाश उमरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी नानाभाऊ पटोले यांनी 20 जिल्ह्यातील समाजबांधवांशी सविस्तर चर्चा केली . कार्यक्रमासाठी उपस्थितांचे आभार अजय तायडे यांनी मानले.

Post a Comment

أحدث أقدم