जिल्हास्तरीय  मॉडेल मेकिंग स्पर्धेत श्री अ. खि. नॅशनल हायस्कूल व ज्यू.कॉलेज खामगाव च्या विद्यार्थ्यांची राज्यस्तर प्रदर्शनीसाठी  निवड

मलकापूर, बुलडाणा:राष्ट्रीय अवकाश दिनाच्या निमित्ताने १७ ऑगस्ट २०२४ रोजी विज्ञान भारतीच्या विदर्भ प्रदेश मंडळ नागपूर (विभा) व  इस्रो च्या वतीने मलकापूर येथील ली. भो. चांडक विद्यालयात जिल्हास्तरीय  मॉडेल मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८:३० ते सायं. ५:०० या वेळेत झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


या स्पर्धेत स्थानिक खामगाव येथील श्री अर्जन खिमजी नॅशनल हायस्कूल  च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. शाळेच्या दोन मॉडेलची निवड राज्यस्तरासाठी करण्यात आली. या विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमाने आणि बुद्धिमत्तेने तयार केलेले मॉडेल राज्यस्तरीय निवड चाचणी साठी पात्र ठरले आणि त्यांना प्रशंसा आणि मान्यता मिळाली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ उदापूरकर मॅडम , उपप्राचार्य सोनटक्के मॅडम, उपमुख्याध्यापक दिगंबर सर , शाळेचे सर्व पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षिका यांनीही या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि समर्थन दिले.

या यशामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्य आणि समर्पणाचे दर्शन घडले असून, शाळा आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा आणि नवोन्मेष विकसित करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाचे यश सिद्ध झाले आहे. या सुयशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री दिनेशजी संघवी व पदाधिकारी यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. 

या सर्व विद्यार्थ्यांना विज्ञान पर्यवेक्षक श्री क्षीरसागर सर यांचे मार्गदर्शन लाभले व  शाळेतील सर्व विज्ञान शिक्षकांनी सहकार्य केले. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करण्यात येत आहे.

Post a Comment

أحدث أقدم