रिजन सुरज ची प्रथम स्टाफ मीटिंग "अचिव द गोल" संपन्न
खामगाव जनोपचार न्यूज :- शनिवार स.11.00 वा एम जे एफ लॉ सुरज एम अग्रवाल रीजन चेअर पर्सन यांचे अध्यक्षतेखाली व पी एम जे एफ लॉ मुरलीधर उपाध्याय अकोला प्रमुख पाहुणे यांचे उपस्थितीत व पी एम जे एफ लॉ अनिता मुरलीधर उपाध्याय, लॉ सत्यपाल बासानी, एम जे एफ लॉ उज्वल गोयनका यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली. यावेळी संपूर्ण रिजनचा कामकाजाविषयीचा आढावा सर्व झोन चेअर पर्सन यांनी प्रस्तुत केला तसेच याप्रसंगी उपस्थित लॉयन मेंबर साठी प्रश्नमंजुषा एम जे एफ लॉ नरेश चोपडा यांनी आयोजित केली. उपस्थित सर्व क्लबच्या अध्यक्षांसाठी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व कामांमध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी ओपन फोरमचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विविध उपलब्धी प्राप्त लॉयन्स मेंबरचा सत्कार सुद्धा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती पी एम जे एफ लॉ मुरलीधर उपाध्याय यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. एम जे एफ लॉ सुरज एम अग्रवाल यांच्या समायोजित भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी तिन झोन चेअर पर्सन, विशेष उपस्थिती म्हणून एम जे एफ लॉ डॉक्टर सुरेखा मेंढे उपस्थित होत्या त्याचबरोबर सर्व कॅबिनेट ऑफिसर सर्व क्लबचे अध्यक्ष सचिव व कोषाध्यक्ष यांचे सह गणमान्य व्यक्ती उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम जे एफ लॉ प्राध्यापक वीरेंद्र शहा यांनी तर आभार प्रदर्शन लॉ संजय उमरकर यांनी केले. अशी माहिती लॉयन्स क्लब संस्कृती खामगाव होस्ट क्लब चे पी आ रो एम जे एफ लॉ राजकुमार गोयनका यांनी दिली.
إرسال تعليق