शिवाजीनगर पोलिसांची दमदार कारवाई: पाच मोटरसायकली सह दोन घरफोडया डिटेक्ट
डीएसपी थोरात डीवायएसपी ठाकरे यांचे पत्रकार परिषदेत माहिती
खामगाव :- शिवाजी नगर पोलिसांची दमदार कारवाई समोर आली आहे.. दोन आरोपी कडून 05 मोटार सायकल व दोन घराफोडी चे गुन्हे उघड करुण आरोपीतांना जेर बंद केले आहे. ठाणेदार पितांबर जाधव यांच्या डीबी पथकाने ही कारवाई केली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील विलास निंबाळकर वय 23 वर्ष रा.घाटपुरी खामगाव 2. अजय शालीग्राम अडणे वय 32 वर्ष रा. मोचीपुरा, वार्ड क्र 03 तेल्हारा जि. अकोला ह.म. घाटपुरी खामगाव यांनी केलेल्या गुन्हयाची कबूली दिल्याने त्यांचे ताव्यातुन 1. ड्रिम यूगा कंपणीची मो.सा.क्र.MH-28BH1552 कि.40000/-रुपये 2. हिरो स्प्लेंडर प्लस कंपणीची मोसा क्र MH28 AD1707 कि.50000/- रुपये, 3. एक सि.बी. शाईन कंपणीची विना नंबर मो सा जिचा चेचीस नं. ME4JC654DH7082298 असा असलेला कि. 40,000/- रुपये 4. एक हिरो होंडा कंपणीची फॅशन प्लस लाल काळया रंगाची मो. सा जिचा चेचीस क्रमांक 07H05C1605- असा असलेला कि.35000/- 2). अप क्र. 179/2024 कलम 379 भादवी मध्ये सुझुकी कंपणीची मोपेड मो सा क्र MH28AV-1787 कि 20000/- रुपये अशा दोन्ही आरोपीतांकडुन एकुन 5 मोटार सायकली एकुन कि. 185000/- रुपये चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.शिवाजी नगर पोलिसांनी पकडलेल्या याच दोन आरोपींनी खामगाव शहरात दोन घर फोड्या केल्याचेही कबूल केले आहे. यात चोरी गेलेले चांदीचे दागीने व नगदी चोरी केल्याची कबूली आहे
पकडण्यात आलेल्या आरोपीतांना त्यास गुन्हयांसंवधाने सखोल व बारकाईने विचारपुस केली असता वर नमुद गुन्हे केल्याची कबुली दिल्याने नमुद दोन्ही अज्ञात आरोपीतांना निष्पन्न करुन आरोपीतांना कायदेशीरीत्या ताब्यात घेवून पो स्टे. ला आणून सदर गुन्हयांत अटक करण्यात आलेली असून पुढील तपास पोलीस स्टेशन शिवाजी नगर येथील डी. बी. पथक करीत आहे
.
إرسال تعليق