भरधाव कार कारच्या धडकेत दुचाकीस्वार इसमाचा मृत्यू : चालक कर्मचारी प्रभंजन जोशीवर गुन्हा
खामगाव-भरधाव वेगातील कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याची घटना बुलढाणा रोडवरील रोहणा नाजिक टर्निंगबर घडली होती. या अपघातातील जखमी इसमाचा उपचारा दरम्यान मृत्यूझाला असून याप्रकरणी कारचालक पोलीस कर्मचारी(?) प्रभंजन जोशी यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील निमकवळा येथील तिघे १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी दुचाकी क्र. एम एच २८ ए व्ही ०६३२ ने पेट्रोल पंपाकडे जात होते. यावेळी टर्निंगबर भरधाव वेगात येणाऱ्या कार क्र. एम एच-१९ मृतक संजय मुंढेश्री जे-५०८४ ने ने सदर चाकीला जबर घडक दिली. या अपघातात दुचाकी वरील गणेश सुधाकर बाघमारे, तुकाराम नामदेव वाघमारे व संजय श्रीराम मुंढे हे तिघे जखमी झाले. या पैकी संजय श्रीराम मुंढे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथून उपचार करून त्यांना घरी आणण्यात आले. मात्र पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना खामगाव सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असताना संजय श्रीराम मुंढे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृनकचा मुलगा शिवाजी संजय मुंडे (२२) रा. निमकवळा याच्या तक्रारीवरून कार चालक पोलीस कर्मचारी प्रभंजन जोशी यांच्या विरुद्ध. खामगाव ग्रामीण पोस्टेला कलम १०६, २८१, १२५, (र) ३२४, (४), भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
إرسال تعليق