खामगावात भाजपाचे मुक आंदोलन
खामगाव (रत्नाताई डिक्कर):- बदलापूर येथील घटनेने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे समाजमन सुन्न केले .अत्यंत दुखदायी तेवढीच चीड येणाऱ्या बदलापूर येथील दुर्दैवी घटनेच्या आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी व या दुर्दैवी घटनेचे गलिच्छ राजकारण करून घाणेरडी मानसिकता दर्शविणाऱ्या महाविकास आघाडीचा निषेध करणे करिता आज सकाळी खामगाव येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी उद्यान येथे भारतीय जनता पार्टी खामगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मूकआंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा,युवामोर्चा, विद्यार्थी आघाडी,महिला मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
إرسال تعليق