राजमाता जिजाऊ महिला जिम, खामगाव
राजमाता माँ जिजाऊंच्या बुलढाणा जिल्ह्यात महिलांच्या आरोग्याला बळकटी देण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होऊन ऑलंपिक सारख्या स्पर्धांमध्ये आपल्या देशाचा सन्मान वाढावा या विचारांनी बुलढाणा जिल्ह्यात सर्वप्रथम खास महिलांसाठी भव्य ‘राजमाता जिजाऊ महिला जिम’ खामगांवात उभारल्या गेला आहे.
दि॰ २४ ऑगस्ट २०२४ रोजी डॉ॰ बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान, खामगांव येथे या जिमचे उद्घाटन थाटामाटात संपन्न झाले. आंतरराष्ट्रीय खेळाडू स्नेहा कोकणे पाटील यांच्या हस्ते या जिमचे उद्घाटन करण्यात आहे.
जिमच्या ईमारत बांधकामासाठी तब्बल १ कोटी ५१ लक्ष रुपये आणि आधुनिक व्यायाम साहित्याच्या खरेदीसाठी ५० लक्ष रुपयांचा निधी खर्चून या ‘राजमाता जिजाऊ महिला जिम’ची उभारणी करण्यात आलेली आहे.
إرسال تعليق