संविधान गुण गौरव परीक्षेचे आयोजन
खामगाव- संविधानाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त सुजाण नागरिक मंच अंतर्गत स्थापित संविधान गुण गौरव समिती तर्फे 26 नोव्हेंबर 2024 रोजी संविधान दिनी राज्यस्तरीय संविधान गुण गौरव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर परीक्षा लहान गट - इयत्ता 8 वी पर्यंतचे विद्यार्थी, मध्यम गट - इयत्ता 9 त्ो 12 वी पर्यंतचे विद्यार्थी व मोठा गट- इयत्ता 12 वी पुढील विद्यार्थी व इतर नागरिक (वयाची अट नाही) अशा तीन गटात होणार आहे. परीक्षाशुल्क लहान गटासाठी 30 रूपये, मध्यम गटासाठी 40 रूपये व मोठा गटासाठी 50 रूपये राहणार आहे. परीक्षेचे माध्यम मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू असून 100 गुणांचे 50 प्रश्न राहणार आहेत. त्यामध्ये 45 प्रश्न बहुपर्यायी तर 5 प्रश्न लिखित स्वरुपाचे राहतील. सदर परिक्षा प्रा.अनिल अंमलकार यांच्या एएनएस इन्फोव्हॅली आयटीआय चांदमारी खामगाव येथे होणार आहे. परिक्षेचा निकाल 12 जानेवारी 2025 रोजी जाहीर होणार आहे तर बक्षिस वितरण 22 जानेवारी 2025 होणार आहे. विजेत्यांना मोठ्या गटासाठी अनुक्रमे 5 हजार, 4 हजार, 3 हजार व उत्त्ोजनार्थ 1500 रू. व चषक, मध्यम गटासाठी अनुक्रमे 4 हजार, 3 हजार, 2 हजार व उत्त्ोजनार्थ 1000 एक हजार रू. व चषक तर लहान गटासाठी अनुक्रमे 3 हजार, 2 हजार, 1 हजार व उत्त्ोजनार्थ 500 रू. व चषक असे बक्षिसाचे स्वरूप राहील. परीक्षेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे. अधिक माहितीसाठी ॲड. झेड.बी.शेख 9422183478, प्रशांत देशमुख 8888515164, ॲड. प्रशांत दाभाडे 9604478175, रमेश डोंगरे 8600698904 व आर.एन.वानखडे 9881025065 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
إرسال تعليق