आषाढी वारी संपली आता एसटी बसेस सुरळीत सुरू करा!
विद्यार्थ्यांसाठी भाजपा युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडी धडकली खामगाव आगारात
खामगाव : जनोपचार न्यूज नेटवर्क:- खामगाव सह शेगाव तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील एसटी बसेस नियमित व वेळेवर येत नसल्यामुळे आज भारतीय जनता युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडी च्या पदाधिकाऱ्यांनी खामगाव आगार प्रमुखांच्या कार्यालयात धडक दिली.
खामगाव तालुका तसेच शेगाव तालुक्यातील खामगाव मतदार संघातील गावातील अनेक सुरळीत सुरू असलेल्या बसेस गेल्या महिन्यापासून काही बंद तर काही वेळेवर येत नसल्यामुळे ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
खामगाव मतदार संघात आ. अँड . आकाश फुंडकर यांचे मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चा तसेच विद्यार्थी आघाडी यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ,"*तुम्ही हाक द्या ..आम्ही साथ देवू* " हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शालेय स्तरावरील व इतरही समस्या सोडविण्यात येत आहेत. नियमित बस सेवा वेळेवर नसल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याची अनेक गावातील विद्यार्थ्यांनी मदतीची हाक भाजपा युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडी खामगावच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात दिली होती. परंतु आषाढी वारी साठी अनेक विशेष बसेस खामगाव आगारातून पंढरपूरला गेल्या असल्यामुळे भाजपा युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करण्यास टाळले होते. परंतु आता आषाढी एकादशी ची वारी संपल्यामुळे आज भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व संबंधित ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी विद्यार्थी यांच्या सोबत थेट खामगाव आगार प्रमुख यांचे कार्यालय गाठले. आगार प्रमुख श्री हर्षल साबळे यांच्याशी भेट घेऊन त्यांना ग्रामस्थ विशेषता विद्यार्थी यांची होणारी मोठी अडचण लक्षात आणून दिली व तातडीने पूर्ववत असलेल्या बसेस त्याच वेळेवर सुरळीत करण्याची विनंती केली न केल्यास पुढील आठवड्यात यासाठी मोठे आंदोलन उभे करू असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला. भाजपा युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडी हे आजपासूनच आंदोलन करणार होते परंतु खामगाव आगार प्रमुख हे गेल्या दोन दिवसा आधीच खामगाव मध्ये नवीन रुजू झाले आहेत त्यामुळे त्यांना थोडा वेळ पदाधिकाऱ्यांनी दिला. खामगाव मतदार संघातील खामगाव व शेगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी बसेस सुरळीत न झाल्यास एका आठवड्यानंतर भाजपा युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडी च्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा युवा मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश सचिव राम मिश्रा यांनी दिले. यावेळी आगारप्रमुख हर्षल साबळे यांनी आठवड्याभरात या सर्व विद्यार्थ्यांच्या समस्या सोडू असे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी आगार व्यवस्थापक हर्षल साबळे यांना विविध गावातील विद्यार्थ्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत निवेदन दिले. यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव राम मिश्रा,भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हा अध्यक्ष पवन गरड, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष राज पाटील, शहर अध्यक्ष शुभम देशमुख, भाजपा सोशल मीडिया खामगाव विधान सभा प्रमुख आशिष सुरेखा, यांच्यासह भाजपा युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी यांचे सह या गावातील विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
إرسال تعليق