दि.२० जुलै .खामगाव येथे विश्रामगृहावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार गट याची पक्ष संघटनात्मक बैठक प्रदेश संघटन सचिव रावसाहेब पाटील तथा अल्पसंख्यांक राष्ट्रीय सचिव राहीना परवीन एस खान यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी अल्पसंख्यांक आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष शेख सलीम शेख फरीद तसेच पक्षाचे मार्गदर्शक विकास चव्हाण पक्षाचे संजय बगाडे माजी जिल्हा कार्यकारणी सदस्य संतोष पिसोडे शहराध्यक्ष अमोल विचारे तालुका युवा कार्याध्यक्ष रुद्राक्ष कोकणे संभाजीराव टाले तसेच नवनियुक्त जिल्हा अल्पसंख्यांक आघाडी उपाध्यक्ष हरून सर सह पक्ष कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी सर्वप्रथम राहीना परवीन एस खान राष्ट्रीय अल्पसंख्यांक आघाडी सचिव यांचं स्वागत करण्यात आले तर नवनियुक्त प्रदेश संघटन सचिव रावसाहेब पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला त्यानंतर अल्पसंख्यांक आघाडी चे जिल्हा कार्याध्यक्ष शेख सलीम यांचा नुकताच वाढदिवस झाल्याने पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच नवनियुक्त जिल्हा अल्पसंख्यांक आघाडचे उपाध्यक्ष हरुण कर यांचा सुधा सत्कार करण्यात आला  या पक्ष संघटनात्मक बैठकीत   पक्ष संघटन कसे वाढेल यासाठी यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली यावेळी अनेकांनी आपले विचार तसेच  आपले मत व सूचना  मांडल्या  यावेळी शेख सलीम यांनी सांगितले की कोण काय करतो यापेक्षा मी काय करतो हे महत्त्वाचे आहे असे सांगितले तर संजयजी बगाडे यांनी सांगितले की पक्ष संघटन मजबूत करणे हे सर्वांचे काम आहे .

यावेळी विकास चव्हाण यांनी सांगितले की जो थांबला तो संपला आपण न थांबता आपले काम सुरू ठेवावे . कारण अनेक जण काम करण्यासाठी तयार आहेपुढे राहिना परवीन एस खान यांनी सांगितले की महिला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर संघटनेमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे  तर अखेर मत व्यक्त करताना रावसाहेब पाटील यांनी सांगितले की आपण सर्वचजण एकत्र राहून आपल्यातील जे मतभेद असतील ते बाजूला सारून एकजुटीने पक्ष हितासाठी जर आपण सर्वांनी काम केले तर त्यात पक्षाचे तसेच आपले हित आहे त्यामुळे आपण एक संघ असलो पाहिजे असे मत व्यक्त केले या बैठकीचे सूत्रसंचालन संभाजीराव टाले यांनी केले



Post a Comment

أحدث أقدم