आता लाडकी बहीण योजनेसाठी गाव पातळीवर मोफत नियोजन
योजनेपासून एकही पात्र बहीण सुटणार नाही याची काळजी घ्या -- आ अँड फुंडकर
खामगाव::- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकही पात्र लाभार्थी महिला सुटणार नाही याची काळजी घ्या व महिलांसाठी आणलेल्या या महत्त्वाकांशी योजनेचा लाभ त्यांना भेटण्यासाठी आपण काही दिवस अथक परिश्रम करा असे आवाहन आ अँड आकाश फुंडकर यांनी केले.
![]() |
👆प्रभाग क्रमांक एक मधील महिलांसाठी 👆 |
मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर आज 20 जुलै रोजी स्थानिक प्रशासकीय इमारतीतील महात्मा गांधी सभागृहात अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची विशेष कार्यशाळा आ अँड आकाश फुंडकर यांचे सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यावेळी ते उपस्थित सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका ,सेविका व मदत यांच्याशी बोलत होते. यावेळी आ अँड फुंडकर यांचे सह खामगाव तहसीलदार अतुल पाटोळे ,शेगाव तहसीलदार श्री बाजड, नायब तहसीलदार विजय पाटील, खामगाव गटविकास अधिकारी चंदनसिंग राजपूत, एकात्मिक बाल विकास अधिकारी श्रीमती घेवांदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थी महिलांना मिळावा यासाठी गाव पातळीवरच आ अँड आकाश फुंडकर यांचे सूचना वजा आदेशानुसार करण्याचे नियोजन करण्यात आले ,त्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या कार्यशाळेला संबोधित करताना आ अँड आकाश फुंडकर म्हणाले की महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील गोर गरीब व गरजू आणि सामान्य कुटुंबातील महिलांची आर्थिक स्थिती चांगली व्हावी यासाठी हातभार म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. या योजनेसाठी अनेक जाचक अटी होत्या , त्यामुळे तलाठी व तहसील कार्यालयावर मोठ्या प्रमाणात महिलांनी कागदपत्रांच्या जोडवा जोडवीसाठी गर्दी केली होती. हीच बाब लक्षात घेऊन मी स्वतः तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून या जाचक अटी रद्द करण्याची आग्रही विनंती केली. ही विनंती त्यांनी तात्काळ समजून अनेक जाचकटी रद्द केल्या व महिलांना या योजनेचा अर्ज भरण्यासाठी सोयीचे केले. परंतु आजही विशेषता ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा अर्ज भरताना अनेक अडचणी येत आहेत. अनेक दलाल सक्रिय झाले असून ते त्यांना चुकीची माहिती देऊन त्यांच्याकडून पैसे लुटत आहेत. आता हे अर्ज ऑनलाईन सुद्धा भरण्यात येणार असून त्यांना दोन-तीन दिवसाचा अवधी लागेल. त्यामुळे आपण सर्वांनी गावातील प्रत्येक घरात जाऊन पात्र असलेल्या लाभार्थ्यांची कागदपत्रे गोळा करावी. मोबाईल ॲप द्वारे ज्यांना जमेल त्यांनी त्यांचे अर्ज अपलोड करावे. ज्यांना नसेल जमत त्यांनी तहसील कार्यालयात ते सर्व फॉर्म आणावे. तहसील कार्यालयात ते अर्ज अपलोड करण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यानवयीत करणार असल्याची माहिती यावेळी आ अँड फुंडकर यांनी दिली. आपण सर्व महिला आहेत त्यामुळे महिलांच्या भल्यासाठी असलेल्या या योजनेसाठी आपण आपले योगदान द्यावे व खामगाव मतदार संघातील एकही महिला योजनेपासून सुटणार नाही याची आपण काळजी घ्यावी, ज्या महिलांना कागदपत्रांबद्दल काही माहिती नसेल त्यांना सर्वांना मार्गदर्शन करून त्यांचा सर्व कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज जमा स्वतः करून घ्यावा जेणेकरून या योजनेचा लाभ त्यांना मिळेल. एका आठवड्याच्या आत आपण सर्वांनी गावातील प्रत्येक पात्र लाभार्थी महिलांचे परिपूर्ण अर्ज जमा करावे जेणेकरून ते आपण वेळेच्या आधी ऑनलाईन अपलोड करू शकू, त्यामुळे आतापासूनच कामाला लागा व पात्र लाभार्थी महिलांचे अर्ज भरून त्यांचे आशीर्वाद मिळवा असे आवाहन सुद्धा यावेळी आ. अँड आकाश फुंडकर यांनी केले. तत्पूर्वी तहसीलदार अतुल पाटोळे व गटविकास अधिकारी चंदनसिंग राजपूत यांनी उपस्थित सर्वांना या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे अर्ज कसा भरावा तो कसा अपलोड करावा आदी मार्गदर्शन केले. तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या या योजनेबाबतच्या अडचणी व समस्या जाणून घेऊन त्यांचे समाधान केले. महात्मा गांधी सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत खामगाव व शेगाव तालुक्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका ,सेविका व मदतनीस यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
إرسال تعليق