बच्चुभाऊ "यु आर राईट...."
ऑफलाइन जुगारावर कारवाई तर ऑनलाइन जुगारावर कारवाई का नाही! माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांनी केला प्रश्न उपस्थित
अवैध या शब्दाचा अर्थ असा आहे की जे व्यवसाय शासनमान्य नाहीत त्यांना अवैध असा शब्द लावून अवैध व्यवसाय करणाऱ्यावर पोलीस विभागाकडून नेहमीच कारवाई करण्यात येत आहे मात्र काही ठिकाणी अवैध व्यवसाय आहे आर्थिक व्यवहाराची चिरीमिरी करून खुलेआम सुरू आहेत हा प्रकार बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे दिवसाढवळ्या असे अवैध धंदे जसे वरली, जुगार, अवैध दारू विक्री ,गुटखा पुड्या असे विविध धंदे सुरू असताना पोलिसांकडून कारवाई होताना दिसत नाही ज्या ठिकाणी असे अवैध धंदे सुरू आहेत त्या ठिकाणची विविध सामाजिक संघटना राजकीय लोक किंवा इतर गावकरी यांच्याकडून तक्रार आल्यानंतरच पोलीस विभागाकडून कारवाई करण्यात येते हे कितपत योग्य आहे अवैध धंद्यावर आळा बसावा यासाठी पोलीस विभागासह, राज्य उत्पादन शुल्क, अन्न पुरवठा यासह इतरही विविध विभाग आहेत मात्र या विभागाकडून नियमानुसार कारवाया होताना दिसत नाहीत मग हे विभाग नेमके कशासाठी असा प्रश्न सुद्धा या निमित्ताने उपस्थित होत आहे असाच एक प्रश्न माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे 10 जुलै रोजी माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांनी मुंबई येथे एक आंदोलन केले
या आंदोलनामध्ये त्यांनी जे ऑनलाईन जुगार आहेत ते दिवसाढवळ्यात सुरू आहेत मोबाईलवर हे ऑनलाईन जुगार खेळल्या जातात यामधून लाखो रुपयांची उलाढाल सुरू असते मात्र अशा ऑनलाइन जुगार खेळणाऱ्या कुठेही कारवाई होताना दिसत नाही परंतु जे ऑफलाईन जुगार खेळतात अशा लोकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे ज्या ठिकाणी पोलिसांना विश्वासात घेऊन किंवा पोलिसांसोबत चिरीमिरीचे व्यवहार करून असे जुगार अड्डे चालविल्या जातात त्या ठिकाणी कारवाई होत नाही मात्र पोलिसांना न कळवता चोरीछुपे जुगार खेळल्या जातात त्या ठिकाणी मात्र कारवाया करण्यात येतात हे कोणत्या नियमाने सुरू आहे हेच कळेनासे झाले आहे ऑनलाइन जुगार खेळण्यात जर शासनाची परवानगी असेल तर मग ऑफलाइन जुगाराला सुद्धा शासनाने परवानगी द्यायला पाहिजे असा प्रश्न यानिमित्ताने आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे महाराष्ट्र मध्ये शासनाने गुटखाबंदी केली आहे मात्र जेव्हापासून गुटखाबंदी कागदपत्री अमलात आणली आहे तेव्हापासून गुटखाबंदीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात खुलेआम सुरू आहे ज्यादा दराने ही गुटखा विक्री महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी सुरू आहे शासन विविध व्यवसाय बंद करण्यासाठी जीआर नियम काढतात तेवढ्या जोराने चोरीछुपे असे व्यवसाय सुरू राहतात मग याला जबाबदार शासन आहे की प्रशासन आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे बच्चू कडू यांनी उपस्थित केलेला प्रश्न हा नक्कीच खरा असून जर ऑनलाईन जुगाराला मान्यता आहे तर मग ऑफलाईन जुगाराला मान्यता का नाही त्यामुळे पोलीस विभागाने किंवा इतर विविध विभागाने ज्या ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू आहेत त्या ठिकाणी कोणत्याही तक्रारीची वाट न पाहता नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी होत आहे
إرسال تعليق