मेष्टा ची  शिक्षणविभागात  आर टी ई प्रतिकृती बाबत चर्चा

 खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क   - महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन  बुलढाणा कडून शिक्षणअधिकारी  कार्यालय  जिल्हा परिषद बुलढाणा येथे आरटी प्रतिपूर्ती बाबत आढावा घेण्यात आला. एकीकडे शासनाने आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये  मोफत शिक्षणाची व्यवस्था करून दिली असता शासनाकडे मागील सहा वर्षांपासून आर टी प्रतिकृतीची रक्कम प्रलंबित आहे. शाळांना प्रतिकृती साठी  मागणीच्या खूप कमी प्रमाणात निधी वाटप झालेला आहे. यामुळे संस्थाचालकांना संस्था चालवण्यामध्ये अडचणी निर्माण होतात  त्यात अजून 2024 - 25 या सत्रामध्ये आत्ताच नवीन विद्यार्थ्यांची यादी लागलेली आहे. मागील पाच वर्षाची रक्कम प्रलंबित असताना नवीन प्रवेश कसा द्यावा . व प्रतिकृतीची रक्कम ही कधी वितरित केली जाणार या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी आज मेष्टा अकोला जिल्हाध्यक्ष साहेबराव भरणे पाटील, अमरावती विभागीय अध्यक्ष रामकृष्ण गुंजकर  बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्रीकांत चोपडे खामगाव तालुकाध्यक्ष सागर उकर्डे यावेळी जिल्ह्यातील इतरही संस्थाचालक उपस्थितीत होते .

Post a Comment

أحدث أقدم