लॉयन्स क्लब खामगांव संस्कृतीचे कोषाध्यक्ष लॉ. गजानन सावकार यांना सर्वश्रेष्ठ रेकी ग्रॅण्ड मास्टर पुरस्कार प्राप्त
खामगाव जनोपचार नेटवर्क :- श्रीनिकेतन फाऊंडेशन न्युयॉर्क (युएसए) आणि रेकी हिलींग फाऊंडेशन दिल्ली यांच्या तर्फे दि. २१ जुलै रोजी हिंदी भवन दिल्ली येथे गुरूपौर्णिका निमित्त आंतरराष्ट्रीय रेकी पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. रेकी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य आणि प्रचारासाठी हा पुरस्कार दिला जातो. जागतिक रेकी गुरू पुरस्कार जागतिक रेकी मोहिमचे संस्थापक व अध्यक्ष खामगांव रेकी ग्रॅण्ड मास्टर गजानन सावकार यांना देण्यात आला आहे. खामगांवचे नांव रेकीच्या क्षेत्रात जगभर चमकत आहे. जागतिक रेकी मोहिमेत हे ज्ञान दर महिन्याला सलग ४ दिवस मोफत शिकवले जाते. रेकी हे एक वैद्यकशास्त्र आहे जे फार कमी लोकांना माहित आहे. जागतिक रेकी मोहिमेने संपुर्ण भारतातील ४० हजारांहून अधिक लोकांना रेकी शिकविली आहे आणि जगातील १० देशांमध्ये यावर मोफत उपचारही केले जातात. रेकी गुरू गजानन सावकार यांनी प्रत्येक घरात रेकी शिकलेली व्यक्ती असावी असे आवाहनही केले आहे. उपरोक्त माहिती डिस्ट्रीक्ट कॅबीनेट ऑफीस एमजेएफ लॉ. राजकुमार गोयनका पीआरओ यांनी दिली आहे.
إرسال تعليق