खामगांव औद्योगिक क्षेत्राच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा

उद्योगमंत्री उदजी सामंत यांनी आयोजित बैठकीत दिला आदेश

कृषक जमीनीचे तातडीने भुसंपादन करण्यात येणार, औद्योगिक वसाहतीत फायर स्टेशन मंजूर- आ ॲड आकाश फुंडकर

 खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :-राज्याचे उद्योग मंत्री यांनी आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या मागणीनुसार खामगांव औद्योगिक वसाहतीत येत असलेल्या विविध अडचणींबाबत व विस्तारीकरणाची प्रक्रीया तातडीने व्हावी यासाठी बैठक आयोजित केली होती या बैठकीत उद्योग मंत्री उदजी सामंत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना खामगांव औद्योगिक क्षेत्र विस्तारीकरणाचे काम युध्द़ स्तरावर करण्याचे आदेश दिले तसेच खामगांव औद्योगिक क्षेत्रात नवीन फायर स्टेशनला देखील मंजूरात देण्यात येऊन लवकर हे फायर स्टेशन सुरु करण्यात यावे असे आदेश दिले. याबाबत आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे माहिती दिली.

खामगांव औद्योगिक क्षेत्र विस्तारीकरणाची मागणी मागील अनेक वर्षापासून प्रलंबीत आहे. याबाबत आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी संबंधीत अधिकाऱ्यासोबत बैठक आयोजित करण्याची मागणी केली यावेळी प्रधान सचीव उद्योग मुंबई, विभागीय आयुक्त़ अमरावती, मुख्य़ कार्यकारी अधिकारी म.औ.वि.म.मुंबई, जिल्हाधिकारी बुलढाणा, सह मुख्य कार्यकारी अधिकारी मऔविम, सह सचीव अद्योग विभाग , उपमुख्य़ कार्यकारी अधिकारी, मऔविम, महा व्यवस्थापक भुसंपादन, मऔविम, महाव्यवस्थापक भूसंपादन, मऔविम, प्रादेशिक अधिकारी मऔविम, अमरावती, उपविभागीय अधिकारी ततथा भूसंपादन अधिकारी महसूल, खामगांव व इतर सबंधीत अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी कृषक जमीनीचे भूसंपादन प्रचलीत नियमानुसार तात्काळ करण्यात यावे, त्यांना नियमानुसार मोबदला देण्यात यावा, खामगांव शहरातील सुशिक्षीत बेरोजगारांना स्थानिक स्तरावर रोजगार मिळण्याचे दृष्टीने मोठा उद्योगास मंजूरात देण्यात यावी, तसचे या ठिकाणी असलेल्या उद्योगांमध्ये मतदार संघातील स्थानिक कुशल अकुशल कामगारांना व सुशिक्षीत बेरोजगारांना नोकरीसाठी प्राधान्य़ देण्यात यावे.  खामगांव येथील औद्योगिक क्षेत्रात दरवर्षी आग लागण्याच्या घटना घडतात. यात ज्या उद्योगात आग लागली त्या उद्योगाची कोटयावधी रुपयांचे नुकसान होते अनेक वेळा आग लागून जीवित हानी देखील झाली आहे. खामगांव औद्योगिक क्षेत्रात फायर स्टेशन नसल्यामुळे खामगांव नगर पालिकेतील अग्नीशमन दलाला पाचारण करावे लागते.  त्यामुळे लागणाऱ्या विलंबामुळे आगीचे क्षेत्र वाढून हे नुकसान होते. त्यामुळे खामगांव औद्योगिक क्षेत्रात तातडीने फायर स्टेश्न उभारण्यात यावे, एमआयडीसी मधील उद्योगांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे यासाठी जिगाव प्रकल्पातून लागणारे पाणी आरक्षण करण्याबाबतचा प्रस्ताव द्यावा अशी मागणी केली.

उपरोक्त़ मागण्याबाबत  मा. उद्योग मंत्री उदयजी सामंत  यांनी सकारात्मकता दर्शवित संबंधीतांना भुसंपादन करण्याचे आदेश दिले असून खामगांव येथील उद्योगांमध्ये स्थानिकांना प्राधान्य़ देण्याबाबत निर्देश देण्याचे संबंधीतांना आदेश दिले खामगाव येथील उद्योजकांना व अमरावती विभागातील उद्योजकांना होणारा त्रास बघता श्री पारधी प्रादेशिक अधिकारी अमरावती यांची तात्काळ बदली करण्यात येईल, तसचे  मोठ्या उद्योजकांमध्ये भरती प्रक्रिया करताना स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य देण्याबाबत सूचना देण्यात येतील,  व रोजगार उपलब्धतेसाठी नवीन उद्योग देण्याबाबत कारवाई करण्यात येईल अश्या सुचना व आदेश या बैठकीत  सामंत यांनी दिले.

यासोबतच खामगांव औद्योगिक वसाहत येथे नवी फायर स्टेशन मंजूर करण्याबाबत निर्देश दिले असून सदरचे फायर स्टेशन लवकरात लवकर सुरु करण्याबाबत देखील आदेश दिले आहे.  

त्यामुळे खामगांव औद्योगिक वसाहतीचे विस्तारीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला असून लवकरच नवीन उद्योग स्थापन होऊन बेरोजगांराना रोजगाराची नवीन संधी उपलब्ध़ होणार आहे.

Post a Comment

أحدث أقدم