जेसीआय खामगाव जय अंबे  द्वारा आयोजित

 मॅजिककॉन 2024 उत्साहात संपन्न

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:-  वाडी येथे अमरावती विभागस्तरीय जेसीआय झोन X||| मॅजिक कॉन  2024 थाटामाटात पार पडला. मॅजिककॉन 2024 मध्ये अमरावती, अंजनगाव, आकोट, अकोला, खामगाव सह पूर्ण झोन मधून सर्व शहरातील जेसीआय पदाधिकारी यांनी सहभाग घेतला.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून  झोन प्रेसिडेंट2021 जेसी अनुप गांधी, झोन प्रेसिडेंट 2024 जेसी प्रतीक सारडा, चॅलेंज प्रत्रिकेचे चेअरमन जेसी शिवराज टेकाळे, आयपीझेडपी जेसी जितेंद्र बोरा यांची उपस्थिती होती.

   सकाळी 9:00 वाजल्यापासून सर्व जेसी सदस्यांचे आगमन लॉन्स मध्ये झाले. सर्व सदस्यांची नोंदणी करून सर्वांना पुष्पगुच्छ, वेलकम  किट व जेसी बॅच देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. सकाळी लवकर येणाऱ्या सर्व सदस्यांनी रेन डान्स व झुम्बा डान्स चा आनंद घेतला. यानंतर खामगाव ची मोठी आईजगदंबे मातेच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर नमामी गोयनका, रेवा देशपांडे सह बालकलाकारांनी त्यांची नृत्य व गायन कला प्रदर्शित केली. यानंतर सर्व अतिथींचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले यावेळी सर्व अतिथिनी सभागृहाला मार्गदर्शन केले. जेसीआय खामगाव जय अंबे चे अध्यक्ष जेसी डॉ गौरव गोयनका यांनी संस्थेची मागील सहा महिन्यात केलेल्या कार्याबद्दलची माहिती तसेच येणाऱ्या सहा महिन्यासाठी आखलेल्या कार्यक्रमाची रुपरेशा थोडक्यात सांगितली. यानंतर जादूगर  जूनियर इंद्रजीत व जादूगर सीनियर इंद्रजीत खामगाव यांनी त्यांचे मॅजिक शो दाखवून सर्व उपस्थितांचे भरपूर मनोरंजन केले. यानंतर प्रसिद्ध रेकी तज्ञ लाॅ गजानन सावकार यांनी मेडिटेशन व रेकी बद्दल सर्वांना माहिती दिली. यानंतर डॉ सी एम जाधव, डॉ भगतसिंग राजपूत व उद्योजक कमलकिशोर जांगिड या तीन सेल्फमेड व्यक्तींचा लाईव्ह इंटरव्यू ज्यामध्ये त्यांनी त्यांचा जीवन प्रवास उलगडला जेसी अपूर्व देशपांडे व जेसी डॉ श्रुती लड्डा यांनी घेतला.

  तत्पशात दुपारच्या भोजनानंतर अनेक मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये प्रामुख्याने  ग्रुप एंट्री, बॅनर प्रेझेंटेशन, मॅजिक शो, ब्रेन एक्टिव्हिटीज, बीज टॉल्क, हंट शो, टॅलेंट शो,  रॅपिड इपिएस, पहचान कोण, सॅक रेस, हुमन लुडो, टग वॉर आदी कार्यक्रम होते या सर्व खेळांमध्ये जिंकणाऱ्या प्रथम व द्वितीय खेळाडूंचा शेवटच्या सत्रात प्रमुख अतिथींच्या हस्तेे बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

मॅजिककॉन२०२४ च्या यशस्वीरित्या पार पडण्याकरिता प्रणेते जेसी डॉ भगतसिंह राजपूत, अध्यक्ष डॉ गौरव गोयनका, सचिव ऍड दिनेश वाधवानी, अपूर्व देशपांडे, डॉ शालिनी राजपूत, ऍड रितेश निगम,कौस्तुभ मोहता, देवांशी मोहता, रचना बयास, सुरभि गोयनका, डॉ उज्जवला पवार, पूनम घवालकर, निष्ठा पुरवार, रोहन जैस्वाल, योगेश खत्री, मोना खत्री, राहुल नोतानी, डॉ अनुप शंकरवार, चेताश्री शंकरवार, डॉ आनंद राठी, डॉ प्रतिमा राठी, डॉ गौरव लड्डा, डॉ श्रुति लड्ढा, डॉ निखिल लाठे, नम्रता लाठे, डॉ सम्राट मानकर, गजानन जोशी, कुणाल भिसे, कोमल भिसे, आशीष मोदी, सुरभि मोदी, श्वेता अग्रवाल, विन्नि मोहनानी, आकाश बुधवानी, जेसी ऋषिकेश डिडवानिया सहित जेसीआई खामगाव जयअंबेच्या सर्व  सदस्यांनी परिश्रम घेतले.अशी माहिती जेसी रोहन जैस्वाल यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.



Post a Comment

أحدث أقدم