डंपर उसळले...मुरूम रस्त्यावर...

कारवाही नसल्याने अवैध गौण खनिज वाहतूक फोफावली!

सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटोकार यांनी या घटनेवर त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे तरी या घटनेनुसारखी अवैध वाहतूक अवैध खनिज वाहतूक व रेती माफियांवर कारवाई होण्यात यावी व त्यामागील राजकीय चेहरे असल्यामुळे पोलीस प्रशासन कारवाईला कानाडोळा करत आहेत अशी अशी प्रतिक्रिया दिलीप पटोकार यांनी दिली

शेगाव (कमलेश शर्मा) आज सकाळी ८- ८.३० च्या दरम्यान महाविद्यालयाकडून रोकडियानगर कडे जाणाऱ्या खनिज वाहून नेणाऱ्या भरधाव डंपरने स्पीड ब्रेकर वर हेलकावा दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात मुरून रस्त्यावर पडला त्यामुळे येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होऊन अपघात प्रवण स्थिती निर्माण झाली तसेच या रस्त्यावरून सकाळी अकोला - बाळापूर हून येणाऱ्या जड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मध्यरात्री नंतर पहाटेपर्यंत याच मार्गाने रेतीचे डंपर मोठ्या प्रचंड वेगाने जात असतात. मुरारका हायस्कूल  ते काशेलानी पेट्रोल पंप हा मानवी वस्तीतून जाणारा अंतर्गत रस्ता आहे.

जाहिरात

      रोकडीया नगरची वस्ती प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सकाळी विद्यार्थी लहान मुले यांना जीव मुठीत धरून आपला प्रवास करावा लागतो. कोणत्यातरी मोठ्या अपघाताची वाट पाहता त्वरित प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी. ह्याची संबंधित प्रशासकीयअधिकऱ्याने  कर्तव्यदक्षपणे दखल घ्यावी. परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

Post a Comment

أحدث أقدم