कॉलेज ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेस सुरुवात
खामगाव : शहरातील नामांकित महाविद्यालय कॉलेज ऑफ मॅनेजमेंट तसेच लक्ष्मीनारायण ज्युनिअर कॉलेजची शैक्षणिक सत्र २०२४-२५ करिता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून ११ वी, १२ वी कला, वाणिज्य, विज्ञान या सोबतच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयीन अभ्यासक्रम B.A., B.Com.(इंग्रजी / मराठी माध्यम ), B.Sc., B.B.A., B.C.A., M.Sc.(संगणक शास्त्र) ह्या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.
कॉलेज ऑफ मॅनेजमेंट या महाविद्यालयाच्या बि.बि.ए. व बि.सी.ए. या अभ्यासक्रमांना अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्लीची मान्यता मिळाली आहे. पारंपरिक विद्यापिठांतर्गत येणा-या डिग्री अभ्यासक्रम बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन व बॅचलर ऑफ कंम्प्यूटर अॅप्लिकेशन हे अभ्यासक्रम नुकतेच यूजीसीने ए.आय.सि.टी.ई.च्या अंतर्गत घेण्याचा निर्णय घेतला होता त्या अनुषंगाने अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने सदर अभ्यासक्रमांसाठी मान्यतेची प्रक्रिया राबविली होती. त्यानुसार कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, खामगाव ने सुध्दा हे अभ्यासक्रम ए.आय.सि.टी.ई. मार्फत राबविन्याचा निर्णय घेउन सदरची मान्यतेची प्रक्रिया पूर्ण केली होती. त्या अनुषंगाने अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने नुकतीच एका सर्टिफिकेट द्वारा मान्यता क्र. IC202427668 नुसार सत्र २०२४-२५ पासून मान्यता प्रदान केली आहे.
लक्ष्मीनारायण शैक्षणिक बहु उद्देशीय ग्राम विकास संस्थे अंतर्गत लक्ष्मीनारायण ज्युनियर कॉलेज आणि कॉलेज ऑफ मॅनेजमेंटने आपली यशस्वी परंपरा कायम ठेवत आपले शहरातील प्रथम क्रमांकाची वर्चस्व अधोरेखित केले आहे. याचे श्रेय अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, नियमित होत असलेल्या तासिका तसेच सातत्यपूर्ण रित्या विद्यार्थ्यांचा घेतलेला पाठपुरावा, वेळोवेळी होत असलेल्या चाचणी परीक्षा, परीक्षा पूर्व पेपरची संपूर्णतः तयारी करून घेणे आणि या बरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशांनी नानाविविध उपयुक्त कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन या संपूर्ण वैशिष्ठ्यांसह पूर्ण वेळ लक्ष्मीनारायण गृपचे संस्थापक अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान यांचे मार्गदर्शनात संचालिका सौ. राजकुमारी तेजेंद्रसिंह चौहान यांची कार्यकुशलता याला लाभलेले प्राध्यापक वर्ग, कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांचे परिश्रम हीच शहरात प्रथम क्रमांकावर असण्याची लक्ष्मीनारायण इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेज आणि कॉलेज ऑफ मॅनेजमेंटची विशेषता आहे.
तरी विद्यार्थ्यानी शहरातील नामांकित कॉलेज कॉलेज ऑफ मॅनेजमेंट या महाविद्यालयात असणाऱ्या विविध अभ्यासक्रमामध्ये आपला प्रवेश निश्चित करावा. असे आव्हान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान, संचालिका सौ. राजकुमारी चौहान आणि कॉलेज ऑफ मॅनेजमेंटचे प्राचार्य राहुल अग्रवाल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. प्रवेश नोंदणी प्रक्रिया विठ्ठल संकुल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर,(काँग्रेस भवन), रेल्वे स्टेशनच्या बाजुला, खामगाव येथे सुरू झाली आहे. अधिकमाहितीसाठी ,९४२२९१९४९४ ९४२३६०१२५६, आणि ९९६०९६५५६६या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा.
إرسال تعليق