राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा खामगाव विधानसभा मतदारसंघावर दावा

आढावा बैठकीत केली मागणी


खामगांव: जनोपचार न्यूज नेटवर्क :- नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार  पक्ष बैठकीत ज्येष्ठ नेते  टोपे , विदर्भ प्रमुख  गुलाबराव गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तालुका निहाय आढावा बैठक घेतली, त्यामध्ये खामगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाने निवडणूक लढल्यास विजयाचे समीकरण वरिष्ठांकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष  संजय बगाडे, ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील, ज्येष्ठ नेते धोंडीराम खंडारे यांनी पक्षश्रेष्ठीकडे मांडले. आणि याला सकारात्मक प्रतिसाद देत, होऊ घातलेल्या विधानसभा मध्ये घाटाखालील भागामध्ये  जातीय समीकरण, पक्षीय बलाबलं, योग्य उमेदवार  यांचा सखोल अभ्यास करून, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील योग्य निर्णय घेतील. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष खामगाव मतदारसंघ कसा शुकर आहे, ही बाब आम्ही जयंतराव चे लक्षात आणून देऊ, असे यावेळेस नेते टोपे गुलाबराव गावंडे यांनी उपस्थित तालुका कार्यकारणीस आश्वासन दिले.

Post a Comment

أحدث أقدم