युवा सेनेचा इशारा....आणि पालिका लागली कामाला
खामगांव (जनोपचार) :- युवा सेना चा आंदोलनाचा इशारा आणि नगरपालिका लागले कामाला... ही घटना आहे खामगावची ! झाले असे की, खामगांव शहर प्रमुख राहुल कळमकार यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजयभाऊ अवताळे यांच्या प्रमुख उपस्थितीत खामगांव नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दाल फैल भागातील ६ हातपंत दुरूस्त करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले होते. निवेदनात नमुद करण्यात आले होते की, भर उन्हाळ्यामध्ये दालफैल भागातील नागरीकांना पाणी टंचाईची सोसावी लागत असतांना सुध्दा दाल फैल भागातील ६ हातपंत नादुरूस्त आहेत तसेच नगर परिषदेच्या वतीने तब्बल १२ दिवसांआड नळाव्दारे पाणी पुरवठा होतो त्यामुळे गोरगरीब नागरीकांच्या घरी पाण्याची साठवण करायला जागा नसल्यामुळे त्यांना दुरूवरून पाणी आणावे लागत आहे. याच संदर्भात न. प. मुख्याधिकारी , कर्मचारी आणि ठेकेदार यांच्या सोबत वारंवार तोंडी चर्चा केल्यानंतर सुध्दा हे काम अजूनही करण्यात आलेले नाही तरी तातडीने या गंभीर प्रश्नी लक्ष घालून संबंधीत ठेकेदाराला हातपंप दुरूस्ती करण्याचे आदेशीत करावे आणि तो हे काम करीत नसेल तर त्याचेवर कार्यवाही करावी. त्याच प्रमाणे दालफैल हा शहरातील संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत ते सुध्दा तातडीने सुरू करण्यात यावे. वरील दोन्ही कामे लवकरात लवकर न झाल्यास लोकशाही मार्गाने शिवसेना, युवा सेना, विद्यार्थी सेना, शिवसेना महिला आघाडी, शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष आणि परिसरातील समस्त नागरीकांचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुध्दा निवेदनात देण्यात आला होता. या निवेदनाची दखल घेत न. प. मुख्याधिकारी यांनी संबंधीतांना हातपंप दुरूस्ती व पथ दिवे सुरू करण्याचे आदेश दिले. कर्मचारी आणि ठेकेदार यांनी संबंधीत ठिकाणी येवून पाहणी केली आणि तात्काळ कामाला सुरूवात झाली असून यामुळे परिसरातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी युवा सेना खामगांव शहर प्रमुख राहुल कळमकार यांचे सह धिरज कंटाळे, विक्की सारवान, शुभम मोरे, सुनिल नवले, रोहित भारसाकळे, आकाश दांडगे, लकी पुरोहित, कौशभ बडगुजर, पंकज अंभारे यांचे सह परिसरातील असंख्य नागरीक उपस्थित होते.
إرسال تعليق