श्री.महेश नवमीनिमित्त खामगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन

खामगाव - जनोपचार न्यूज नेटवर्क:-     माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिवस जेष्ठ शुध्द नवमी महेश नवमी म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त माहेश्वरी समाजाच्यावतीने 14 जून पासून दोन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आयोजित शोभायात्रेमध्ये अबालवृध्द, समाजबंधू, महिला, नवयुवक आपला सहभाग नोंदविणार आहे.

  यावेळी शोभायात्रा, महेशपुजन तसेच आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, निबंध स्पर्धा, रक्त तपासणी शिबिर, जेष्ठांचा सत्कार, गुणवंतांचा सत्कार, महिलांचे विविध कार्यक्रम, समयोचित व्याख्याने, क्रीडा स्पर्धा, नृत्य स्पर्धा, स्वच्छता मिशन, वृक्षारोपण, लहान मुलांसाठी संस्कार शिबिर आदी समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

14 जून रोजी सकाळी  8 वाजता माहेश्वरी भवन येथे श्री महेश परिवारतर्फे महेश ध्वजारोहण होवून मुकबधीर विद्यालयात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता श्री माहेश्वरी महिला मंडळाकडून डॉ.विशाल सुरेका व डॉ. सुजाता लढ्ढा (सुरेका) यांचे आयुर्वेदिक रोग निदान तसेच उपचार शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे. सदर शिबिर हे निःशुल्क राहणार आहे. तसेच दुपारी 3 वाजता कहानियोरी बेल करो त्यौहारो सु मेल स्पर्धा होवून दुपारी 4 वाजता चलो बचपन की ओर हा कार्यक्रम पार पडणारआहे. संध्याकाळी 6.30 वाजता श्री माहेश्वरी वरीष्ठ महिला प्रकोष्ठद्वार आपोरा संस्कार ही नाटिका सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता श्री माहेश्वरी बहु-बेटी मंडळाद्वारे संगीतमय सुंदरकांडाचे आयोजन होणार आहे.



15 जून रोजी सकाळी 7 वाजता आराध्यदैवत श्री महेश भगवान रूद्राभिषेक होणार आहे. सकाळी 9 वाजता श्री माहेश्वरी युवक मंडळाकडून शहरातून भव्य मोटर सायकल रॅली काढण्यात येणार आहे. नंतर 10.30 वाजता श्री महेश परिवाराकडून भव्य रक्तदान शिबिर, श्री माहेश्वरी वरीष्ठ पुरूष प्रकोष्ठ यांच्या तर्फे निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे. संध्याकाळी 4.30 वाजता शहरातून भव्य शोभायात्राही निघणार आहे.  तरी समाजाबांधवांनी मोठ्या संख्येने सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन श्री महेश नवमी उत्सव साजरा करावा असे आवाहन अ‍ॅड. बाबू भट्टड सचिव श्री माहेश्वरी मंडळ खामगाव यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم