टॅग(बिल्ला) नसलेल्या गाय व बैलांची नियमबाह्य विक्री?
युवा हिंदू प्रतिष्ठानने उठविला आवाज ..!
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- एक जून पासून लागू करण्यात आलेल्या नवीन निवामानुसार गुरांना टॅग (बिल्ला)लावणे बंदर कारक आहे. मात्र या नियमांना धाब्यावर बसून बाजार समितीच्या गुरांच्या बाजारात आज विना टॅग च्या गायी व बैलांची विक्री होत असल्याची बाब समोर आली. त्यामुळे युवा हिंदू प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष रोहित पगारिया यांनी याबाबत गुरांच्या बाजारात प्रत्यक्ष भेट देऊन प्रकरण चव्हाट्यावर आणले. नियम बाया गाय व बैलांची विक्री केल्या जात असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.
दरम्यान पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. एक जून पासून अमलात आलेल्या नियमानुसार प्रत्येक गुरांना टॅग असणे अनिवार्य आहे त्यामुळे आज गुरुवारी अनेक त्याग नसलेल्या गुरांची खरेदी विक्री झाल्याचा आरोपही पगारिया यांनी व्यक्त केलाय.
إرسال تعليق