डेंटल हॉस्पिटल जवळ प्रतिबंधित गुटखा जप्त 

4 लाख 45 हजाराचा मुद्देमाल सह मीरचंदानीला अटक: एसडीपीओ ठाकरे यांच्या पथकाची कारवाई

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा एका वाहनात घेऊन जात असताना खामगाव उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या पथकाने पकडला. एका डेंटल क्लिनिक जवळ ही कारवाई करण्यात आली. 

मिळालेल्या माहितीनुसार पंकज धरमदास मीरचंदानी हा एका मारोती सुझुकी सेलेरिआ कंपनीची जुनी वापरती कार (क्रं. MH-06 BU-9629) मध्ये प्रतिबंधित गुटखा घेऊन जात होता दरम्यान पथकाने छापा टाकून कार मधून काळ्या रंगाची प्लास्टीक पन्नीचे ज्यावर बँच नं. MP/06/2024 असलेले केसरयुक्त विमल पान मसाला चे गुटख्याच्या पुड्या असलेले 52 पुडे प्रत्येकी कि. 120/- रुपये एकुण 6240/- रुपयाची एक पोतडी अशा एकुण 04 पोतडया कि, 24960/- रुपयांच्या 01 पोत्यांमध्ये मिळुन आले. असे एकुण 03 पोते किंमत 74,880/- रुपयाचे, 2) वि-1 तंबाखु अश्या लिहीलेल्या काळ्या रंगाचे प्लास्टीक पंन्नीचे ज्यावर बॅच नं. VCT/06/2024 असे सुंगधीत तंबाखुच्या पुड्या असलेले 52 पुडे प्रत्येकी 30/- रुपये असे एकुण 1560/- रुपयची एक पोतडी अशा एकुण 03 पोतड्या किंमत 6240/- रुपयाचे एक पोते असे एकुण 18,720/- रुपये 3) एक वि-1 तंबाखु अश्या लिहीलेल्या कथ्या रंगाचे प्लास्टीक पंन्नीचे ज्यावर बॅच नं. VCT/06/2024 असे सुंगधीत तंबाखुच्या पुड्या असलेले 52 पुडे प्रत्येकी 33/- रुपये असे एकुण 1716/- रुपयाची एक पोतडी अशा एकुण 04 पोतडया किंमत 6864/- रुपयाचे 02 पोतड्या असे एकुण 13,728/- रुपये. 4) कथ्या रंगाचे प्लास्टीक पन्नीचे बॅच नं. MP/06/2024 असलेले केसरयुक्त विमल पान मसाला चे गुटख्याच्या पुड्या असलेले 52 पुडे प्रत्येकी 187/- रुपये प्रमाणे एकुण 9724/- रुपयाची एक पोतडी अश्या एकुण 04 पोतडया किंमत 38,896/- रुपयाचा एक पोत्यामध्ये मिळुन आले असे 77,792/- रुपयाचे असा एकुण त्याचे ताब्यामध्ये गुटखा पान मसाला व सुंगधीत तंबाखुचा एकुण 1,85,121/- रु. 5) एक मारोती सुझुकी सेलेरिआ कंपनीची जुनी वापरती कार क्रं. MH-06 BU-9629 किंमत अंदाजे 3,00,000/- रुपये असा एकुण 4,85,121/- रू.चा मुददेमाल जप्त करण्यात आला असून पोहेका सुधाकर थोरात यांच्या पिराजी वरून आरोपी विरुद्ध कलम 328,188,272,273 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास  अधिकारी - पोउपनी राजेश गोमासे करीत आहेत.


Post a Comment

أحدث أقدم