पाच गावातील विद्युत पुरवठा 30 तासापासून खंडित
खामगाव :-गेल्या तीन दिवसापूर्वी खामगाव तालुक्यात कोसळलेल्या मुसळधार पावसानंतर बहुतांश गावातील विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता. परंतु त्या गावातील विद्युत पुरवठा वीज कंपनीने सुरळीत केला मात्र तालुक्यातील शिरजगाव ,गारडगाव, गोंधनापूर ,कंजारा व धापटी या पाच गावाचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी विज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना यश मिळाले नाही. परिणामी गेल्या 30 तासापासून गावकऱ्यांना परेशानीचा सामना करावा लागत आहे. विद्युत नसल्यामुळे अबाल वृद्धांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. गावात वीज नसल्यामुळे मोबाईल देखील बंद पडले आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी बाधा निर्माण होत आहे. वीज कंपनीकडून व्यवस्थित उत्तर मिळत नसल्याने गावकरी हाताश झाला असून लवकरात लवकर उपरोक्त गावाचा विद्युत पुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
إرسال تعليق