तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रियेसाठी कागदपत्रे जमा करून ठेवण्याची सूचना

शासकीय तंत्रनिकेतन खामगांवला एक गौरवशाली परंपरा लाभलेली असून मागील ६४ वर्षात येथून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी मोठमोठ्या पदांवर आपल्या सेवा दिलेल्या आहेत. संस्थेत विद्यार्थ्यांच्या शारीरिक, शैक्षणिक आणि क्रीडा सुविधा पुरविण्याकडे लक्ष देण्यात येते. नेतृत्व गुण अंगी यावेत म्हणून विद्यार्थ्याचे संसद मंडळ, व्यक्तिमत्व विकासासाठी मान्यवरांचे मार्गदर्शन, सक्रिय माजी विद्यार्थी संगठन, औद्योगिक सहली, ६ आठवड्यांचे औद्योगिक प्रशिक्षण, स्नेहसंमेलन, आंतर विभागीय खेळ स्पर्धा, वर्षभरात साजरे केले जाणारे वेगवेगळे दिवस, थोर महापुरुषांच्या जयंती, महाराष्ट्र दिन, प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिवस इत्यादी मोठ्या उत्साहाने साजरी केली जातात. विद्यार्थ्याना शासकीय नियमाप्रमाणे प्रवेशाच्या वेळेस शासकीय नियमाप्रमाणे आरक्षण आणि सर्व त-हेच्या शिष्यवृत्ती प्रदान केल्या जातात. कॅम्पस प्लेसमेंटच्या बाबतीत संस्था संपूर्ण महाराष्ट्रात अग्रेसर असून संस्थेने विद्यार्थ्यांना नावाजलेल्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंट दिलेले आहे आणि अजून काही कंपनीज येतच आहेत. मुलांचे आणि मुलींचे स्वतंत्र वसतिगृह संस्थेत आहे. संस्थेतील सर्व शिक्षकवर्ग हा उच्चाविद्याविभुषीत असून विद्यार्थयांकडे त्यांचे व्यक्तिगत स्तरावर नियंत्रण असते.

ही कागदपत्रे करा गोळा :- साधारणपणे जात/जमात प्रमाणपत्र, नॉनक्रिमी लेयर प्रमाणपत्र (३१ मार्च २०२५ पर्यंत वैध असलेले), अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी प्रमाणपत्र, दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र, एनसीसी प्रमाणपत्र, इंटरमिजीएट परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्रांची आवश्यकता पडते. अनुसूचित जाती-जमातीव्यतिरिक्त उर्वरित सर्व मागासवर्गीय उमेदवारांना नॉनक्रिमी लेयर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.




याच लौकीकांमुळे दहावीच्या निकालानंतर सर्वच विद्यार्थ्यांना आपल्याला शासकीय तंत्रनिकेतन खामगांवला प्रवेश मिळावा हि मनस्वी इच्छा असते. परंतु बऱ्याचदा कागदपत्रांच्या कमतरतेमुळे पात्रता असूनही प्रवेशाच्या वेळेस त्यांची धावपळ होते.  म्हणूनच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालया अंतर्गत येणा-या पदविका प्रवेश प्रक्रियांसाठी आवश्यक ती कागदपत्रे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर जमा करून ठेवण्याचे आवाहन तंत्रशिक्षण संचालनालयाने केले आहे. यासंदर्भात आवश्यक लागणारी कागदपत्रे कोणती हे माहिती संचालनालायाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या प्रक्रियेवेळी कागदत्रांच्या अभावाने कुठलाही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून आतापासूनच विद्यार्थ्यांनी तयारी करण्याची सुचना निर्गमित करण्यात आलेली आहे.  



 अर्ज केलेल्या विद्यार्थांच्या कागदपत्रांची पडताळणी सुविधा केंद्रांवर केली जाते. शासकीय कार्यालयांमध्ये प्रवेश काळात कागदपत्रांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येतात. त्यामुळे कागदपत्रे प्राप्त करण्याची प्रक्रिया आत्तापासूनच पार पाडल्यास ऐन वेळेवर कागदपत्रे मिळण्याविषयी समस्या उद्भवत नाही आणि प्रवेश कालावधीत ती सहज उपलब्ध होतील. 

त्याचप्रमाणे सैन्य दलातून किंवा अल्पसंख्यांक संवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणा-या उमेदवारांच्या प्रवेशासाठी आवश्यक ती प्रमाणपत्रे महत्वाची आहेत. आरक्षित घटकातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र योग्य वेळेत न मिळाल्यास त्यांचा प्रवेश खुल्या संवर्गातून निश्चित केल्या जातो. त्यामुळे कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी संबंधित कागदपत्रे महत्वाची आहेत व ती आधीच जमा करून ठेवावीत असे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयचे संचालक मा.डॉ.विनोद मोहितकर यांनी आव्हानित केलेले आहे. विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास त्यांनी शासकीय तंत्रनिकेतन खामगांव या संस्थेतील प्रथम वर्ष प्रवेश समितीतील समुपदेशन कक्षात व्यक्तिश: चौकशी करावी असे शासकीय तंत्रनिकेतन खामगांवचे प्राचार्य डॉ समीर प्रभुणे यांनी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविलेले आहे.

Post a Comment

أحدث أقدم