वाडी व अमृतनगर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सात घरं फोडली; दागिन्यांसह हजारोंचा ऐवज लंपास स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

इन्वेस्टीगेशन करताना डीवायएसपी ठाकरे ठाणेदार नाचणकर

खामगाव-चोरट्यांच्या टोळीने काल रात्री बाडी व अमृतनगर भागात धुमाकूळ घालत तब्बल सात घर फोडली चोरट्यांनी यातील काही घरांमधून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकम लंपास केली आहे. एकाच रात्री घडलेल्या या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

....जाहिरात....

 वाडी येथील वृंदावन नगरातील रहिवाशी श्रीकृष्ण पांडुरंग धानखेडे (३९) हे बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरटयांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व घरातील अलमारीतून सोन्या-चांदीचे दागिने एक मोबाईल असा ५० हजाराचा मुद्देमाल लंपास केला. त्याचप्रमाणे याच भागातील अरुण रमेश वानखडे (४०)हे देखिल बाहेरगावी गेले असल्याने चोरटयांनी त्यांच्या घरात घुसून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २५ हजारांचा ऐवज लंपास केला. तसेच वाडी येथील प्रशांत भाऊराव सरोदे (४५) हे पहाटे मॉर्निंग वॉकला गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घरात घुसून अलमारीतून २५ हजार रुपये चोरुन नेले, वाडीमधील गायकवाड व अनंता धुमाळे यांची घरं देखील चोरटयांनी फोडली असून त्यांच्या घरातून किती साहित्य गेले हे समजू शकले नाही. त्याचप्रमाणे अमृत नगरात राहणारे विज वितरणचे अभियंता चिन्मय अंजनकर यांच्या घरात देखील चोरीचा प्रयत्न झाला आहे. तसेच याच भागातील आणखी एक घर फोडल्याची माहिती मिळाली आहे. 

......जाहिरात.....

या घटनांची माहिती मिळताच शहर पोस्टेचे ठाणेदार व कर्मचाऱ्यांनी या भागात जावून पाहणी केली. वृत्तलिहेपर्यंत पुढील पोलीस कारवाई सुरु होती. एकाच रात्री सात ठिकाणी चोऱ्या झाल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.



Post a Comment

أحدث أقدم