विदर्भ साहित्य संघाच्या सांजपाडवा कार्यक्रमात
‘साक्षात जिजाऊ' एक पात्री प्रयोगाला रसिकांची दाद
खामगाव : विदर्भ साहित्य संघ शाखा खामगावच्या वतीने यावर्षीही सांज पाडवा या कार्यक्रमाचे आयोजन ८ एप्रिल रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये सौ.गौरीताई अशोक थोरात यांच्या साक्षात जिजाऊ या एकपात्री प्रयोगाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
हा कार्यक्रम स्थानिक कोल्हटकर स्मारक मंदिरात संध्याकाळी पार घडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष रामदादा मोहिते होत.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलित करून करण्यात आली. सुरुवातीला कु. सारा रघुनाथ खेर्डे हिने महाराष्ट्र गीत सादर केले. त्यानंतर प्रस्ताविकातून ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे यांनी विदर्भ साहित्य संघाच्या वतीने गेल्या १४ वर्षापासून सांजपाडवा या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला करण्यात येते असे सांगून विदर्भ साहित्य संघाच्या विविध उपक्रमाची माहिती दिली तर अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ साहित्यिक रामदादा मोहिते यांनी यांनी सुद्धा विदर्भ साहित्य संघाच्या विविध उपक्रमाबाबत सांगितले. तसेच छत्रपती शंभुराजे यांच्या बलिदान दिनानिमित्त शंभू राजांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सादर करण्यात आलेल्या सौ. गौरीताई थोरात यांनी ‘साक्षात जिजाऊ’ या एकपात्री प्रयोगातून जिजाऊंचा जीवनपटा सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांची कर्तबगारीचे विविध प्रसंगाचे वर्णन रोमाचंक, ओजस्वी भाषेत करण्यात आले. यावेळी प्रेक्षकांनी भरपूर दाद दिली. कार्यक्रमाचे संचालन शशांक कस्तुरे तर आभार प्रदर्शन रघुनाथ खेर्डे यांनी केले. कार्यक्रमाला प्रतिष्ठीत नागरिक, सदस्य व विदर्भ साहीत्य संघाचे पदाधिकारी श्री.अंजनकर, डॉ.मधुकर वडोदे, वनश्री उर्मिलाताई ठाकरे उपस्थित होते.
إرسال تعليق