महायुतीचे लोकसभा उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या खामगाव प्रचार कार्यालयाचे आज उद्घाटन
खामगाव - भाजप - शिवसेना महायुतीचे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव यांच्या खामगाव येथील लोकसभा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज दिनांक 9 एप्रिल रोजी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सायंकाळी होणार आहे.
येत्या 26 एप्रिल रोजी बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होऊ घातले आहे. या निवडणुकीत शिवसेना - भाजप - राष्ट्रवादी - रिपाई (आठवले) - रासप महायुतीकडून सलग चौथ्यांदा खासदार प्रतापराव जाधव निवडणूक रिंगणात उतरले आहेत. बुलढाण्यात चौकार देशात चारशे पार चा नारा देत महायुतीकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा एक शिलेदार म्हणून खासदार प्रतापराव जाधव यांना पुन्हा एकदा लोकसभेत पाठवण्यासाठी महायुती सज्ज झाली आहे. दरम्यान आज दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी खासदार प्रतापराव जाधव यांच्या खामगाव येथील लोकसभा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सायंकाळीं 5 वाजता लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याजवळ, भारत बिज भांडार समोर खासदार प्रतापराव जाधव, खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड. आकाशदादा फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जेष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महायुती परिवार, बुलढाणा लोकसभा मतदार संघाकडून करण्यात आले आहे
.
---------------------------------------------------------
إرسال تعليق