नांद्री फाट्यावर अपघात -एक ठार: एक गंभीर
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नांदरी फाट्याजवळील वळणावर चार चाकी वाहन अनियंत्रित झाल्याने अपघात घडला .यामध्ये एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज संध्याकाळी घडली. घडलेल्या या दुर्दैवी अपघातात गोंधनापूर येथील २९ वर्षीय डॉ.आकाश सुरेश खेडकर यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत वाहनात असलेले डॉक्टर श्रीकांत दारमोडे राहणार कदमापुर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या वर सिल्वर सिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वृत्तलेपर्यंत पोलीस कारवाई सुरू होते या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
إرسال تعليق