वासनांध तरुणाचा मित्रावरच अनैसर्गिक अत्याचार! एका वर्षापासून सुरू होता प्रकार
अत्याचाराला त्रासून पीडित तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न !
जळगांव जामोद (प्रतिनिधी) - जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या भेंडवळ येथील 23 वर्षीय तरुणावर 27 वर्षीय तरुणाने तब्बल एका वर्षापासून अनैसर्गिक अत्याचार करीत संभोग केल्याची धक्कादायक घटना दिनांक 2 एप्रिल रोजी समोर आली आहे. सदर या घटनेने जळगाव जामोद तालुका हादरून गेला असून पिडीत तेवीस वर्षीय तरुण युवकाने छळाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्याच्यावर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघेही तरुण एकमेकांचे मित्र आहेत. यातील आरोपी मित्र भगवान वाघ याने त्याच्या मित्राच्या साध्या स्वभावाचा गैरफायदा उचलत त्याचेवर वेळोवेळी अनैसर्गिक अत्याचार करीत होता. या अत्याचाराला कंटाळून पीडित तरूणाने 2 एप्रिल रोजी उंदिर मारण्याचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने उपचारासाठी अकोला येथील शासकीय रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. पीडित तरुणाचा पोलिसांनी जबाब घेतला असून जबाबावरून जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी भगवान प्रमोद वाघ (27) याच्या विरोधात अप नं 204/2024 कलम 377 भादवी, सहकलम अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी भगवान प्रमोद वाघ हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी करीत आहेत.
إرسال تعليق