1 मे रोजी ऑल इंडिया मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन : औचित्य माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या वाढदिवसाचे
......जाहिरात....

 खामगांव जनोपचार न्यूज नेटवर्क: -  ऑल इंडिया कौमी तंजीम व काँग्रेस अल्पसंख्याक सेल खामगावच्या  वतीने कर्मयोध्दा माजी आमदार राणा दिलीपकुमारजी सानंदा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  समाजात जातीय सलोखा राहावा व शांतता प्रस्तापित व्हावी या उदद्ेशाने दरवर्ष्ाी प्रमाणे यंदाही बुधवार दि.01 मे 2024 रोजी जातीय सलोख्यावर आध्ाारित ऑल इंडिया मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
.......जाहिरात.......


बुधवार दि.01 मे 2024 रोजी सायं.6 वाजता पासुन ते रात्री 12 वाजेपर्यंत  खामगांव येथील मस्तान चौक भागातील मरहुम जिया उलहक खान साहेब नगर परिष्ाद उर्दु शाळेच्या भव्य प्रांगणावर हा ऑल इंडिया मुशायरा आयोजित केलेला आहे.  या ऑल इंडिया मुशायरा कार्यक्रमात भारतातील नामवंत शायर,कवी सहभागी होणार आहे. यामध्ये मेराज आफरिदी  (उतराखंड),हामीद भुसावली,हाशीम फीरोज़ाबादी(उतर प्रदेश),सतलज राहत इन्देरी (मध्य प्रदेश),वाहीद अन्साारी  (मध्य प्रदेश), नईम फराज़,अलतमश तालीब  (नांदेड), नम्रीता श्रीवास्तव. (भोपाल),अकील साहीर,अनीस शोक,मतीन तालीब, खुबैब ताबीशसह  नामवंत शायर आपली शायरी सादर करणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा याकरीता मुशायरा समीतीचे गठन करण्यात आले असुन या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु झाली आहे.
.......जाहिरात......



तरी या ऑल इंडिया मुशायरा कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ऑल इंडिया कौमी तंजीमचे शहर अध्यक्ष आबीद उलहक, कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेलचे शहर अध्यक्ष नावेद अथहर उर्फ बबलु पठान यांनी केले आहे.


Post a Comment

أحدث أقدم