सिध्दीविनायक टेक्नीकल कॅम्पस, शेगांव मध्ये पूल कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- वसुंधरा बहुउद्देशिय सामाजिक संस्था, खामगांव व्दारा संचालीत सिध्दीविनायक टेक्नीकल कॅम्पस, शेगांव मध्ये दि. २३ मार्च २०२४ रोजी विद्यार्थ्या करीता पूल कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये १२ वी, पदविका (यंत्र, विद्युत आणि अणुविद्यत आणि दुरसंचार अभियांत्रिकी) आणि पदवी (यंत्र अभियांत्रिकी) विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. या मध्ये देवगिरी फोर्जिंगस प्रा. लि., एस्सेम अॅटो इलेक्ट्रीकल प्रा. लि. आणि लक्ष्मी अग्नी प्रा. ली. या नामांकित कंपनीच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना ही संधी प्राप्त करुन दिली होती. या प्लेसमेंट ड्राईव्हची सुरुवात शारदा मातेच पूजन आणि दिपप्रज्वलन करुन करण्यात आली.

या प्लेसमेंट ड्राईव्हसाठी कंपनीचे मानव संसाधन अधिकारी (एचआर) श्री. क्रिष्णा मुंडे, श्री. प्रशांत पांडे, श्री. सचिन कुळकर्णी, यांची प्रमुख उपस्थिती होती. या कंपनीचे उपस्थित प्रतिनिधीचे स्वागत अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत जी. कुळकर्णी व तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. प्रिती अ. चोपडे महाविद्यालयाचे पदवी विभागाचे प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी प्रा. प्रतिक देशमुख तसेच पदविका विभागाचे प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी प्रा. सागर पानगोळे तसेच प्रा. पुजा दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. कंपनीचे मानव संसाधन अधिकारी श्री. प्रशांत पांडे, श्री. सचिन कुळकर्णी, श्री. क्रिष्णा मुंडे यांनी कंपनीच्या प्लेसमेंट ड्राईव्ह बाबतची थोडक्यात माहिती करुन दिली. यानंतर विविध महाविद्यालयामधुन आलेल्या विद्यार्थ्यांनी या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये आपला सहभाग नोंदविला. कंपनीचे मानव संसाधन अधिकारी यांनी कंपनी बाबत सविस्तर माहिती आणि कंपनी व्दारा देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा बाबत माहिती दिली.

Advt.

या प्लेसमेंट ड्राईव्हकरीता १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या नावाची नोंदणी केली होती. नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांमधून एस्सेम अॅटो इलेक्ट्रीकल प्रा. लि. या नामांकित कंपनी करीता १० विद्यार्थ्यांची तर लक्ष्मी अग्नी प्रा. ली. या नामांकित कंपनी करीता १० अशा एकूण २० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सिध्दीविनायक टेक्नीकल कॅम्पस मध्ये या अगोदरही नामांकित उद्योग समुहासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजनकेले होते व महाविद्यालयातील निवडक विद्याथ्यर्थ्यांची जीकेएन ऐरोस्पेस, पुणे, बजाज अॅटो लि. संभाजी नगर / पुणे ई. जी. कांतावाला पुणे, फॅल्श इलेक्ट्रॉनिक्स पुणे, संदेन विकास प्रा. लि., पुणे, धुत ट्रॉन्समिशन संभाजी नगर, लिअर कार्पोरेशन पुणे, पीयागो प्रा. लि., व्हिडीओ कॉन प्रा. लि., मोबाईल कॉम प्रा. लि., ब्ल्यु समायर, न्यू दिल्ली, अँडव्हांस इमरर्जन्सी लि. मुंबई व हिदुस्थान कॉम्प्युटर लि. (एचसीएल) अशा नामांकित उद्योग समुहात मोठ्या प्रमाणात निवड झाली आहे. ही बाब उल्लेखनिय आहे. सदर पुल कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वतीतेकरीता अथक परिश्रम घेतले.


या पूल कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह कार्यक्रमांचे सुत्रसंचलन प्रा. पल्लवी सातव यांनी केले तर कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन प्रा. कांचन कंकाळे यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष मा. सागर फुंडकर व उपाध्यक्ष अॅड. मा. आमदार आकाशदादा फुंडकर यांनी महाविद्यालयातर्फे मुलाखती झालेल्या व पुढील नियुक्तीसाठी पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन उज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.


Post a Comment

أحدث أقدم