खामगांव :- दि.24 मार्च 2024 रोजी सानंदा निकेतन येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सानंदा परिवाराच्या वतीने होलीकोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी विधीवत पुजा-अर्चा करुन होळी पेटविण्यात आली.याप्रसंगी राणा गोकुलसिंह सानंदा,माजी आ. राणा दिलीपकुमार सानंदा,माजी नगराध्यक्ष राणा अशोककुमार सानंदा,माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा, राणा राजेंद्रसिंह सानंदा, राणा मुकेशसिंह सानंदा यांच्यासह सानंदा परिवारातील सदस्य उपस्थित होते.

जाहिरात

यावेळीमाजी आ. राणा दिलीपकुमार सानंदा यांनी होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा,दारिद्रय,आळस यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद,सुख,आरोग्य आणि शांती नांदो व रंगपंचमीचा विविध रंगाप्रमाणे अनेक रंगांनी जीवन उजळुन सर्वांना सुख,शांतीआणि समृध्दी लाभावी अशी होलीका मातेजवळ प्रार्थना करून समस्त नागरिकांना होळी व धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या.



Post a Comment

أحدث أقدم