सिध्दीविनायक टेक्नीकल कॅम्पस  मध्ये महिला स्वंय संरक्षण कार्यशाळा 



खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: वसुंधरा बहुउद्देशिय सामाजिक संस्था, खामगांव व्दारा संचालित सिध्दीविनायक टेक्नीकल कॅम्पस, शेगांव  मध्ये दि. 09 मार्च 2024 रोजी जागतिक महिला दिनानिमित्य महिला स्वंय संरक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  या जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे उद्घाटन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत जी. कुळकर्णी व तंत्रनिकेतन महाविद्यालयांच्या प्राचार्या प्रिती अ. चोपडे व कार्यक्रमांकरीता प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री विजय अंबुसकर सर स्वंय सिध्दा तज्ञ मार्गदर्शक बुलडाणा जिल्हा यांच्या हस्ते करण्यात आले. 

जाहिरात

कार्यक्रमाकरीता प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री विजय अंबुसकर सर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना उत्कृष्ठ असे स्वंय सिध्दा म्हणजे महिलांना स्वंरक्षण कसे करावे यांचे प्रात्यक्षिक करुन दाखवले व त्याच्याकडून प्रात्यक्षिक करुन घेतले. या झालेल्या प्रशिक्षण कार्यशाळेला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्कृष्ठ असा प्रतिसाद लाभला. या जागतिक महिला दिनानिमित्य तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रिती अ. चोपडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आपल्या देशातील कर्तृत्वान महिला प्रतिभाताई पाटील, किरण बेदी, कल्पना चावला, मदर टेसेसा इत्यादी महिलांच्या जीवनावर प्रकाश टाकीत आपण आपले ध्येय गाठावे याबाबत र्मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. राधिका बिहाडे व प्रा. मयुरी अवताडे तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता अथक परिश्रम घेवून कार्यशाळा यशस्वीरित्या पाड पाडली.

जाहिरात


या कार्यक्रमांचे सुत्रसंचलन प्रा. प्रिती मार्के यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. कांचन कंकाळे यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष श्री सागरभाऊ फुंडकर व संस्थेचे उपाध्यक्ष तथा आमदार ॲड. मा.आकाशदादा फुंडकर यांनी महाविद्यालयात विद्यार्थीनीकरीता जागतिक महिला दिनानिमित्य आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल आयोजकाचे तसेच सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

أحدث أقدم