"महिला दिन" निमित्त जेसीआय खामगाव जय अंबे व इनरव्हील क्लब तर्फे महिलांसाठी कार्यशाळा संपन्न

 जेसीआय खामगाव जयअंबे, इनरव्हील क्लब व सिल्वरसिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10 मार्च 2024 रोजी महिलांसाठी मासिक पाळी, मेनस्ट्रल कपचा वापर व शरीराची निगा या विषयांवर शहरातील सुप्रसिद्ध गायनॅकॉलॉजिस्ट डॉ शारदा नितीश अग्रवाल यांची मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन सिल्वर सिटी हॉस्पिटल येथे करण्यात आले होते.

 यावेळी बोलताना डॉ शारदा अग्रवाल यांनी उपस्थित तीनही संस्थेतील सर्व महिलांना मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी व त्यादरम्यान वापरण्यात येणारे मेनस्ट्रल कप जे सिलिकॉन पासून तयार करण्यात येतात ज्याचा वापर महिलांसाठी आरामदायक व सुरक्षित कसा असतो, त्याचा वापर कसा करायचा या बद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती दिली तसेच कार्यशाळेत उपस्थित महिलांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या मनातील शंकेचे निरसन केले. तत्पशात जेसीआय खामगाव जय अंबे व इनरव्हील क्लब तर्फे डॉ शारदा अग्रवाल यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

  या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेसीआय खामगाव जय अंबे अध्यक्ष जेसी डॉ गौरव गोयनका, सचिव जेसी एडवोकेट दिनेश वाधवाणी, इनरव्हील क्लब अध्यक्ष सौ रंजीता अग्रवाल, सचिव सौ निधी गर्ग, सिल्वरसिटी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ अशोक बावस्कर, सीईओ डॉ पराग महाजन, जेसी डॉ सौ प्रतिमा राठी, जेसी डॉ सौ कोमल गोयनका, जेसी डॉ सौ श्रुती लढ्ढा, जेसी डॉ सौ शालिनी राजपूत, जेसी सौ पुनम घवाळकर, जेसी सौ कोमल भिसे, सौ साक्षी गोयनका, सौ अग्रवाल काकू, जेसी सौ सुरभी मोदी, डॉ सौ समृद्धी मेंढे, जेसी सौ निष्ठा पूरवार, जेसी सौ सुरभी गोयनका सौ शारदा गुप्ता, सौ आशा झुनझुनवाला, सौ सुनीता मोदी यांसह जेसीआय खामगाव जय अंबे, इनरव्हील क्लब व सिल्वर सिटी हॉस्पिटलचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. 

Post a Comment

أحدث أقدم