आईच्या हस्ते प्रा. डॉ .प्रमोद चव्हाण यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन.

 शिंगणे महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले प्रा.डॉ.प्रमोद चव्हाण यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन पंचायत समिती शिक्षक पतसंस्थेच्या हॉलमध्ये मोठ्या थाटात पार पडले.

बुलढाणा जिल्ह्याची आर्थिक व्यवस्था, बुलढाणा जिल्ह्याची सामाजिक व्यवस्था, HISTORY OF INDIA या तिन्ही पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या आई सौ .विमल रामेश्वर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. याच सोबत समाजातील गुणवंत व शासकीय सेवेमध्ये रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमोद पाटील हे होते. प्रमुख प्रमुख उपस्थितीमध्ये शिवाजी महाविद्यालय मोताळा येथील माजी इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. विजय धुमाळ , संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य राजेंद्रसिंग देवरे, वडील रामेश्वर चव्हाण, रमेश जुमडे व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते. इतिहासकार या.मा काळे यांच्यानंतर बुलढाणा जिल्ह्याची ब्रिटिश काळातील संपूर्ण माहिती संकलित करून पुस्तक रूपात त्याची मांडणी केलेले प्रा.प्रमोद चव्हाण हे पहिलेच लेखक आहे असे गौरवोद्गार प्रा. डॉ. राजेंद्रसिंग देवरे यांनी काढले. 

आईच्या हातून पुस्तक प्रकाशित करून त्यांना सन्मान देणारे पहिले लेखक म्हणून प्रा. डॉ. प्रमोद चव्हाण यांचा नाम उल्लेख करावा लागेल असे  प्रतिपादन प्रा. डॉ विजय धुमाळ यांनी केले . कीर्ती राजपूत ,राहुल बोराडे ,मानसिंग इंगळे ,अमोल जाधव ,अमर जाधव ,संग्राम चव्हाण ,सुशांत इंगळे, सुरज इंगळे ,अभय तोमर स्वप्निल चव्हाण ,राधिका चव्हाण ,सोहम चव्हाण, ऋषिकेश राऊळ ,श्रद्धा चव्हाण, प्रदीप वानखडे गौरव इंगळे, चि .राजपूत इत्यादी विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमासाठी विद्यार्थी, इतिहास संशोधक, संशोधक विद्यार्थी, अनेक मान्यवर नागरीकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शुभांगी चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.शैलेंद्रसिंग चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ प्रमोद चव्हाण यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم